कोकण

रत्नागिरी ः सुधारित नळपाणी योजनेची पाइपलाइन पुन्हा फुटली

CD

- rat10p1.jpg-KOP23M15151 रत्नागिरी : शहरातील विलणकरवाडी येथे सुधारित नळपाणी योजनेचा पाईप फुटून रस्ता खचून खड्डा.

सुधारित नळपाणी योजनेची पाइपलाइन पुन्हा फुटली
रत्नागिरी, ता. १० ः शहरातील सुधारित नळपाणी योजनेची पाइपलाइन पुन्हा फुटली आहे. विलणकरवाडी येथे राहणारे बोरकर कुटुंबीय यांच्या घरासमोरचं पाइपलाइन फुटून रस्ता खचत चालल्याने त्यांच्या राहत्या घराला धोका उद्भवण्याची शक्यता असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाइपलाइन फुटल्याने रस्ता खचत आहे. खचत चाललेल्या रस्त्यात नेमका पाईप कुठे फुटला याचा शोध घेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत; पण चिखलामुळे त्यांचे शर्थीचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत होते. त्यांच्या या प्रयत्नांना उशिरा का होईना यश आले आहे. यावरून योजनेसाठी टाकलेले पाईप किती कमी दर्जाचे आहेत हे लक्षात येत आहे. जनतेच्या माध्यमातून पालिकेकडे अनेक तक्रारी आहेत. तरी पालिका प्रशासन ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप होत आहेत. विलणकरवाडीतील दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT