कोकण

कुडाळ ‘रोटरी’ अध्यक्षपदी आजगावकर

CD

15249
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना दिनेश आजगावकर, संजना काणेकर, शशी चव्हाण, प्रणय तेली आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ ‘रोटरी’ अध्यक्षपदी आजगावकर

उद्या पदग्रहण; संजना काणेकर ‘इनरव्हील’च्या अध्यक्ष

कुडाळ, ता. १० ः रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षपदी दिनेश आजगावकर, उपाध्यक्षपदी शशिकांत चव्हाण, सचिव डॉ. संजय केसरे, खजिनदार रुपेश तेली यांची, तर इनरव्हील क्लब, कुडाळच्या अध्यक्षपदी संजना काणेकर, उपाध्यक्षपदी पद्मा वेंगुर्लेकर, सचिव वैशाली पडते, खजिनदार डॉ. उज्ज्वला सावंत, ‘आयएसओ’पदी राजश्री सावंत, एडिटर सानिका मदने, सीएलसीपदी डॉ. सायली प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ बुधवारी (ता. १२) येथील महालक्ष्मी सभागृहात डिस्ट्रिक्ट ३१७० गव्हर्नर इलेक्ट शरद पै व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या दीपा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती रोटरी व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी रोटरीचे मावळते अध्यक्ष अमित वळंजू, नूतन अध्यक्ष आजगावकर, असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे, डिस्ट्रिक्ट ३१७० झोनल को-ऑर्डिनेटर प्रणय तेली, माजी असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, सचिव डॉ. संजय केसरे, खजिनदार रुपेश तेली, माजी अध्यक्ष सचिन मदने, मकरंद नाईक, सई तेली, इनरव्हीलच्या पीडीसी डॉ. प्रभू, अध्यक्षा काणेकर, सचिव पडते, खजिनदार डॉ. सावंत आदी उपस्थित होते.
रोटरी इंटरनॅशनलची २०२३-२४ साठी नवीन थीम ‘क्रिएट होप इन द वर्ल्ड’ असून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला आहेत. डिस्ट्रिक्ट ३१७० झोनल को-ऑर्डिनेटर तेली, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एरिया अॅड. गजानन कांदळगावकर, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, राजन बोभाटे, संजय पुनाळेकर असणार आहेत. यावर्षीचा ‘रोटरी व्यवसाय सेवा’ म्हणजे ‘व्होकेशनल अॅवॉर्ड’ कुडाळचे उद्योन्मुख व्यावसायिक भार्गवराम धुरी यांना देण्यात येणार आहे. नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकपदी निवड झालेले डॉ. श्रीपाद पाटील यांचा कुडाळ रोटरीकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वार्षिक पदग्रहण सोहळ्यात शैक्षणिक प्रगतीत विशेष प्राविण्य संपादित केलेल्या रोटरी पाल्यांचा तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या रोटरी सदस्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
................
चौकट
‘रोटरी’तर्फे विविध उपक्रमांचा संकल्प
रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून २०२३-२४ या वर्षात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, ह्दयरोग तपासणी शिबिर, जयपूर फूट शिबिर, एमएचएम कार्यक्रमांतर्गत कुमारवयीन मुलींसाठी विविध उपक्रम, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन अध्यक्ष आजगावकर यांनी व्यक्त केला. ‘इनरव्हील’कडूनही वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे नूतन अध्यक्षा काणेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT