कोकण

विलवडे-टेंबवाडी शाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा

CD

15272
विलवडे ः टेंबवाडी शाळा नं.२ मध्ये संजय सावंत व वंदना सावंत यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

विलवडे-टेंबवाडी शाळेमध्ये
विद्यार्थी गुणगौरव सोहळा
बांदा ः विलवडेचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातत्त्व विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता संजय सावंत यांच्यावतीने प्राथमिक शाळा विलवडे-टेंबवाडी नं. २ शाळेत विद्यार्थी वार्षिक गुणगौरव सोहळा झाला. यावेळी सावंत यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. मुलांना यशस्वी बनविण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून त्यासाठी खेळ, मौजमज्जा, गप्पागोष्टी, नाच गाणी हे खूप महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत विलवडे गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, वंदना सावंत, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, केंद्रप्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा दळवी, अजित दळवी, उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी आदींसह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. विलवडे-टेंबवाडी शाळा नं. २ आणि अंगणवाडी, मळावाडी व टेंबवाडी येथील आजी-माजी विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. नरेंद्र सावंत यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. मुख्याध्यापक सुरेश काळे यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका प्रमिला ठाकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT