कोकण

बचतगटांसाठी डब्ल्यू- 20 परिषद

CD

२५ (टुडे पान ३ साठी)

- rat११p१६.jpg-
२३M१५३८६
रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत बोलताना प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर. सोबत प्रकाश सोहोनी, प्रसन्न दामले, शिल्पा पानवलकर आणि स्वप्नील सावंत.
-----------

बचतगटांसाठी रत्नागिरीत डब्ल्यू- २० परिषद

रत्नागिरी, ता. ११ ः भारताला जी-२० गटाचे अध्यक्षपद असून, या अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजतर्फे डब्ल्यू-२० परिषद, चर्चासत्र, कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. रत्नागिरीत प्रथमच अशी परिषद होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात होणाऱ्या या परिषदेत बचतगटांच्या क्लस्टरच्या समन्वयिका व सदस्य सहभागी होणार आहेत. १५ जुलैला शिरगाव येथील संस्थेच्या कडवाडकर संकुलातील पवार सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे प्रकल्प समिती सदस्य प्रकाश सोहोनी, प्रसन्न दामले, शिल्पा पानवलकर, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत आणि बीसीए कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जी-२० अध्यक्षतेच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन भारत ३२ वेगवेगळ्या शहरांमधील ५०हून अधिक शहरांमध्ये २००हून अधिक बैठकांचे आयोजन करत आहेत. या अंतर्गत डब्ल्यू-२० परिषद रत्नागिरीत आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल या वेळी संस्था पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एसएनडीटी विद्यापिठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२० आयोजनासाठी केली आहे. शिरगांव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था एसएनडीटी विद्यापिठाशी संलग्न असल्याने डब्ल्यू-२०च्या आयोजनाची संधी मिळाली आहे. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमेनद्वारे ही संधी मिळणार आहे.
वुमन लिड डेव्हलपमेंट या अंतर्गत ग्रासरूट वुमन लीडरशिप या विषयाची निवड केली आहे. यामध्ये तालुक्यातील बचत गटाच्या सर्व १० क्लस्टर को- ऑर्डिनेटर्स यांचे तळागाळातील महिलांचे नेतृत्व या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याचे प्रभारी प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी सांगितले. या १० क्लस्टर्सचे बचतगट स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
------

महिलांनी सहभागी व्हावे

महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे १९९९-२००० पासून शिरगांव, रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमेन अत्यंत प्रभावी व कार्यक्षमपणे कार्यरत असून, एसएनडीटी महिला विद्यापिठाशी संलग्नित आहे. डब्ल्यू-२० परिषदेत सकाळी १० ते ११.३० या वेळेत महिलांना सहभागी होता येईल. या कार्यक्रमाला महिला बचतगट समन्वयक सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT