कोकण

सावर्डे ः रिक्टोली-तिवडी धरण प्रकल्प रखडला

CD

जलसंधारणातून संपन्नतेकडे मालिका भाग ः २---लोगो

रिक्टोली-तिवडी धरण प्रकल्पाला मिळणार चालना

निविदा प्रक्रियेपर्यंत कार्यवाही ; २३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
----
दृष्टिक्षेपात
* रिक्टोली, तिवडी गावातील पाणीप्रश्न सुटेल
* अंदाजे ५१ लाखाचा धरण प्रकल्प
* आमदार शेखर निकम यांचे विशेष प्रयत्न

संदीप घाग ः सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ११ ः महाविकास आघाडी सरकार काळात चिपळूण तालुक्यातील रिक्टोली-तिवडी गावात धरणप्रकल्प मंजूर झाला होता. त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या कामाचे जलसंधारण विभागाकडून अंदाजपत्रक बनवून निविदा काढण्यात आली. एक वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे व भाजपप्रणित सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात कोकणातील मंजूर कामांना स्थगिती दिली. त्यात रिक्टोली-तिवडी धरणाच्या कामाला शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे हे धरण रखडले असून, ओलिताखाली येणारी जमीन, पाणीटंचाईचे प्रश्न जैसे थे राहिल्यामुळे ग्रामस्थांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
रिक्टोली तिवडी धरणाचे अंदाजपत्रक अंदाजे रक्कम ५१ कोटी असून, यामध्ये ३०.६८ हेक्टर क्षेत्रे भूसंपादन केले जाणार आहे. जलवाहिनी, धरणाचे प्रत्यक्ष काम, इमारत, देखभाल अशी विविध कामे यामध्ये घेण्यात आली आहेत. या धरणामुळे २ हजार ८३५ सहस्र घनमीटर पाणी साठवण क्षमता यामध्ये केली जाणार आहे. यामुळे ०.१३ हेक्टर क्षेत्र बुडित क्षेत्र असून, २३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या धरण प्रकल्पामुळे परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढ होणार असून उन्हाळी शेती करण्याची संधी मिळणार आहे. या ओसाड पडिक जमिनी लागवडीखाली येऊन दुर्लक्षित शेती व्यवसायात ऊर्जितावस्था प्राप्त होईल.
आमदार शेखर निकम यांनी रिक्टोली-तिवडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पाला मंजुरी मिळवली होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर ज्या कामांना स्थगिती दिली. त्यात रिक्टोली-तिवडी धरणाचा समावेश आहे. सध्या सत्तेत उपमुख्यमंत्रीपद मिळालेले अजित पवार यांना स्थानिक आमदार शेखर निकम यांनी पाठबळ दिल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
------
कोट
रिक्टोली तिवडी धरण योजनेस प्रशासकीय मान्यताप्राप्त असून, या योजनेस सद्यःस्थितीमध्ये स्थगिती आहे. ही स्थगिती उठल्यावर मुख्य धरणाच्या कामाची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे
- सागर भराडे, उपविभागीय अधिकारी, चिपळूण

कोट
तिवरे धरणाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाव लागत आहे. रिक्टोली, तिवडी धरण ही ग्रामस्थांची गरज आहे. या धरणामुळे आकले, दादर, गाणे, कळकवणे, दळवटणे, वालोटी येथील गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांनी हे धरण मंजूर झाले आहे. राजकीय सत्तांतरामुळे मंजूर काम रखडले; मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे स्थगित कामांना मंजुरी मिळेल.
- प्रेरणा शिंदे, माजी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT