कोकण

सेवानिवृत्त बौद्ध कर्मचारी संघातर्फे सिंधुदुर्गनगरीत विद्यार्थी गुणगौरव

CD

15460
सिंधुदुर्गनगरी ः गौरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत सेवानिवृत्त बौद्ध संघटनेचे पदाधिकारी.


गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

सिंधुदुर्गनगरीत सोहळा; सेवानिवृत्त बौद्ध कर्मचारी संघाचा पुढाकार


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवन सभागृहात विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी (ता. ९) उत्साहात झाला.
भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन आणि बुद्ध वंदना, संविधान प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सूर्यकांत कदम, महासचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष अरविंद वळंजू, उपाध्यक्ष आनंद धामापूरकर, सहसचिव नरेंद्र पेंडूरकर, महिला प्रतिनिधी रुपाली तेंडुलकर, श्रद्धा कदम आदी उपस्थित होते. महासचिव जाधव यांनी प्रास्ताविक, उपाध्यक्ष धामापूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष वळंजू यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर दहावी, बारावी, पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह, फोल्डर फाईल, गुलाब पुष्प व पेन आदी साहित्य देऊन गौरविण्यात आले. सेवानिवृत्त, आजीव सभासदांनाही सन्मानित केले. विद्यार्थ्यांमधून समृद्धी कांबळे, वेदांत सावंत, विशाखा कदम, सदस्य आरती कदम, रुपाली तेंडुलकर, मोहन जामसंडेकर, सुहास कदम, सिद्धार्थ कदम, पालक शर्मिला कदम, दीपक जाधव, संजय सावंत आदींनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्ष कदम यांनी संस्थेच्या पतसंस्था उभारणी संकल्प पूर्ततेस सहकार्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन श्रद्धा कदम यांनी केले. रुपाली तेंडुलकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT