कोकण

कातळावरील भात लावण्यांमध्ये व्यत्यय

CD

(टीप- या बातमीशेजारी चिपळूणची KOP23-A85924 नंबरची बातमी घ्यावी
------------------------------------

फोटो ओळी
- rat११p३८.jpg-KOP२३M१५४८२ रत्नागिरी ः पाऊस पडल्यानंतर भात लावण्या उरकून घेण्यात व्यस्त असलेले शेतकरी.
(मकरंद पटवर्धन, सकाळ छायाचित्रसेवा)

कातळावरील भात लावण्यांमध्ये व्यत्यय
दोन दिवस उघडीप ; ५३० हेक्टरवर लावण्या पूर्ण
रत्नागिरी, ता. १० ः मोसमी पावसाची सुरवात उशिरा झाल्यामुळे भात लावण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आठ दिवस समाधानकारक पाऊस पडल्यांतर दोन दिवस उघडिप दिल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील कातळावरील लावण्यांच्या कामात व्यत्यय आला आहे. मात्र पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी भात लावण्यांची काम सुरु आहेत. तालुक्यात ६ हजार ८३३ हेक्टर एकूण क्षेत्र असून आतापर्यंत ५३० हेक्टरवर लावण्या झाल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यात मागील आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाला; मात्र मंगळवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात पाऊसच पडलेला नाही. १ जुनपासून आतापर्यंत ७९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सलग पडलेल्या पावसामुळे पेरण्या शंभर टक्के झाल्या असून पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकर्‍यांनी लावणीची कामे सुरू केली आहेत. रविवारपासून तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. दुपारी कडकडीत उन पडत आहे. आधीच मोसमी पाऊस लांबल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या असून भात लावण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे. जून महिन्यात सुरवातीला पेरण्या केलेल्या शेतकर्‍यांना रोपांचा तुटवडा जाणवत आहे. पुरेशी रुजवात न झाल्यामुळे मिरजोळेसह अनेक गावातील शेतकर्‍यांच्या लावण्या रखडल्या. उपलब्ध भात रोपांवरच काही शेतकर्‍यांनी लावणी आटपून घेतली आहे. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही लावण्यांच्या कामाला वेग आलेला नाही. आतापर्यंत दहा ते पंधरा टक्केच लावण्या झालेल्या आहेत.
तालुक्यात तालुक्यात एकूण खरीपाचे क्षेत्र ६ हजार ८३३ हेक्टर असून आतापर्यंत ५३० हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील ६० टक्के क्षेत्र हळवे बियाण्यांचे आहे तर उर्वरित ४० टक्के मध्ये २० टक्के निमगरवे आणि २० टक्के गरवे बियाण्यांचे आहे. सुरवातीच्या टप्प्यात वीस टक्के पेरण्यांमधून उगवलेल्या रोपांच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. दोन दिवस पाऊस थांबल्यामुळे कातळावरील लावण्यांना ब्रेक लागला आहे. पाणथळासह पाणी उपलब्ध असलेल्या जागांवरील लावण्या करण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे. तसेच बहुसंख्य शेतकर्‍यांनी उशिराने पेरण्या केल्यामुळे त्यांना लावण्यांसाठी अजून पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
----
कोट
समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दुबार पेरण्या करण्याची वेळ आलेली नाही. पाऊस थांबल्याने कातळावरील शेतीची कामे थांबली आहेत. तालुक्यात भात लावण्यांचे चित्र समाधानकारक आहे.
- माधव बापट, कृषी अधिकारी, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT