कोकण

सोमेश्वरात दोन गटात जोरदार राडा

CD

१४ (पान ३ साठी)

सोमेश्वरात दोन गटात राडा

जुना वाद उफाळला ; पाच जणांवर गुन्हा, गस्त वाढवली

रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील सोमेश्वर गावात १४ वर्षांपूर्वी राजकीय वादातून झालेल्या खुनाचा वाद पुन्हा उफाळला. शिक्षा झाल्याच्या रागातून रविवारी (ता. ९) चौघांनी खून झालेल्या रवी मयेकर यांच्या पुतण्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तोपर्यंत सोमवारी (ता. १०) दुपारी विरोधी गटातील पाचजणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्लाप्रकरणी पाचजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर गावात २००९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सोमेश्वर मयेकरवाडी येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद झाला होता. या वादातून त्या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे काम करणारे रवींद्र उर्फ रवी मयेकर यांची हत्या करण्यात आली होती. रवी मयेकर यांची हत्या करणाऱ्या रूपेश मयेकर यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने रूपेश मयेकर याला शिक्षा सुनावली होती. याचा रविवारी सायंकाळी रवी मयेकर यांचा पुतण्या सूरज मयेकर हा गावातील ग्रामपंचायतीसमोर असलेल्या पानपट्टीजवळ उभा असताना रूपेश मयेकर याने त्याचे मित्र विरेंद्र शिंदे, संदीप कदम या दोघांच्या मदतीने सूरजला बेदम मारहाण केली. त्यानंतर सूरजने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी रूपेश मयेकर, विरेंद्र शिंदे, संदीप कदम यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या मारहाणीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले.
सूरज मयेकर मारहाण प्रकरणामुळे विरोधी गटातील पाचजणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांना लाठ्याकाठ्यांसह लोखंडी सळीने बेदम मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्या तक्रारीवरून पाचजणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावात तणाव असल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
---------------
चौकट-
सोमेश्वर गावात तणाव
सोमेश्वर गावातील राड्याची माहिती मिळतात रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT