कोकण

आगाशे मंदिरात दीपपूजन

CD

३२ (पान ५ साठी, संक्षिप्त)


-rat१७p३९.jpg-
२३M१६७४५
रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दीपपूजन कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद.
-----------

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दीपपूजन

रत्नागिरी : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन कार्यक्रम करण्यात आला. गेली अनेक वर्षे दीपपूजनाचा कार्यक्रम शाळेत होत आहे. या वेळी विविध प्रकारचे दीप प्रज्वलित करण्यात आले होते. शाळेतील साडेपाचशे विद्यार्थ्यांनी या दिव्यांना नमस्कार केले. श्लोकपठणही केले. दीपस्तंभ, पणती, दिवा, तुपाचा दीप, तेलाचा दीप यासह विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित केले होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, पालक, व्यवस्थापन समिती, पालक संघाचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. भारत शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले.
---------
-rat१७p४२.jpg-
२३M१६७४८
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात दीपपूजनानिमित्त मांडलेले विविध प्रकारचे दीप.
----------

परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरमध्ये दीप पूजन

रत्नागिरी : आषाढ अमावस्येनिमित्त परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात दीप पूजन करण्यात आले. विविध प्रकारचे दिवे मांडून त्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. शाळा गेली दहा वर्षे हा उपक्रम राबवत आहे. वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना यंदा मांडण्यात आली. शिक्षिका सौ. सिनकर यांनी जी- २० आणि वसुधैव कुटुम्बकम् संकल्पना विस्तृतपणे सांगितली. संचालिका विशाखा भिडे यांनी दीप पुजनाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमात शाळेतील गुणवत्ता शोध परीक्षा व ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षांमध्ये प्राविण्यप्राप्त २२ विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. भावे, व्यवस्थापिका श्रीमती आठल्ये आणि मुख्याध्यापक विनोद नारकर उपस्थित होते.
--------
-rat१७p३७.jpg ः
२३M१६७४०
देवरूख वाचनालयात मुलांचा सहभाग.
----------
देवरूख वाचनालयात रमली मुले

साडवली ः मोबाईलच्या युगात विद्यार्थीवर्ग अवांतर वाचन करायला विसरत चालला आहे. वाचनाची गोडी लागावी व मोबाईलचे वेड जरा कमी व्हावे यासाठी देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने मुलांसाठी मोफत पुस्तके वाचण्याची संधी दिली आहे. दर रविवारी दहा ते अकरा या वेळेत मुलांना ही पुस्तके वाचायला मिळतात. पाच मुलांनी सुरू झालेल्या या उपक्रमात रविवारी ५५ मुलांनी सहभाग नोंदवला व पुस्तकांशी मैत्रीचा संवाद साधला. अध्यक्ष गजानन जोशी तसेच गुरूदास अळवणी, वाचनकट्टाच्या संयोजिका मंगला अळवणी या वेळी उपस्थित राहत असतात. वाचनालयात ३९ हजार ग्रंथसंपदा उपलब्ध असून ७ हजार बालसाहित्य संपदा उपलब्ध आहे. बालवाचकांची संख्याही चांगली असून, वर्षातून एकदा बालवाचक पुरस्कारही वाचनालयातर्फे दिला जातो. सर्व वयोगटासाठी नाममात्र शुल्क आकारून वाचनालयाच्या अभ्यासिकेत वाचन करता येते. स्पर्धा परीक्षा व शोधनिबंधांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खुला गट व बालवाचक यासाठी नावनोंदणी सुरू आहे. यासाठी शाळेत जाऊन माहिती देण्याची व ग्रंथ प्रदर्शन भरवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT