कोकण

ओटवणे प्रशालेस सर्वतोपरी सहकार्य

CD

16912
ओटवणे ः अर्चना फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमात अर्चना घारे-परब व अन्य.

ओटवणे प्रशालेस सर्वतोपरी सहकार्य

अर्चना घारे-परब; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १८ ः ओटवणे हायस्कूलच्या यशकीर्तीचे श्रेय येथील विद्यार्थ्यांच्या परिश्रमांसह गुरुजनांच्या चांगल्या अध्यापनालाही आहे. येथील सर्व विद्यार्थी मेहनत घेत असून, भविष्यात तेही उज्ज्वल यश संपादन करतील, यात शंका नाही. ओटवणे हायस्कूलच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिले.
येथील रवळनाथ विद्यामंदिर येथे अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, सगुण गावकर, नेहा मयेकर, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, परेश धरणे, विनायक वर्णेकर, जयगणेश गावकर, ओमकार राऊळ आदी मान्यवर उपास्थित होते.
ओटवणे येथून परीक्षेसाठी सावंतवाडी येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची मोफत सुविधा लवकरच उपलब्ध केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी विद्यार्थी कन्हैया मयेकर यांनी प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले. मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी अर्चना फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते. फाउंडेशनच्या या शैक्षणिक कार्याबाबत पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
--
चौकट
विजेत्यांचा गौरव
यावेळी विद्यालयाच्या करिश्मा राणे, रेश्मा नाईक, सानिका भिसे या दहावीतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेली सतीशा वर्णेकर, आदिती यांनाही विशेष सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिष्यवृती परीक्षेमध्ये चांगले यश मिळविलेल्या साक्षी गावकर, तन्वी गावकर, रिया सावंत यांचाही गौरव करण्यात आला. ओटवणे हायस्कूलबरोबर गावातील इतरही शाळांना वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे घारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT