कोकण

विद्या पुरवणी लेख

CD

२८ (टुडे पान ३ साठी, लेख)
(टीप- विद्या पुरवणीसाठी लेख)


-rat१८p२७.jpg-
२३M१६९५४
वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय
---------

बहुआयामी अभियंता बनविणारे वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय


गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरमध्ये असलेले महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे उत्तम शिक्षण देणारा कॅम्पस, अत्याधुनिक ग्रंथालय, जीमखाना, मैदान अशा विविध सोयीसुविधांनीयुक्त महाविद्यालय आहे. नॅकचे मानांकन मिळवणारे सर्वात तरुण महाविद्यालय अशी मुंबई विद्यापिठांतर्गत या महाविद्यालयाची ओळख आहे. ग्रामीण भागात राहूनही औद्योगिक क्षेत्रासाठी अनुकूल अशी शिक्षणपद्धती अवलंबल्याबद्दल वेळणेश्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला बेस्ट इंडस्ट्रियल इंटरफेस कॉलेज ऑफ दी इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेतर्फे देण्यात आला आहे.
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे बहुआयामी अभियंता बनवणारे विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणून उच्च तंत्रज्ञानाद्वारे अनेक नामांकित अभियांत्रिकी संस्थांबरोबर काम करण्याची संधी या महाविद्यालयात मिळते. महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञ परिषदेशी जोडलेले शास्त्रज्ञ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी दरवर्षी संवाद साधतात. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्राला भेटी देऊन नवतंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती दिली जाते. या महाविद्यालयाला यावर्षी व्हीबॉक्स रोजगार कौशल्य परीक्षा, नॅशनल प्रोग्रामिंग अॅप्टिट्यूड टेस्ट (NPAT), उद्योगजगतातील तज्ञांची व्याख्याने, वाहनदुरुस्ती कार्यशाळा, लेथ ऑपरेटर कोर्स असे प्रत्येक शाखेच्या विभागाचे उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून आपला ठसा उमटवला आहे. अभियंता बनलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तसेच खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या. GATE मध्ये विद्यार्थी पात्र ठरले. एम टेकसाठी आयआयटीसारख्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला.
महाविद्यालयाचे स्वत:चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध आहे. या वसतिगृहाच्या मासिक फीमध्ये २ वेळचे जेवण, नाश्ता यासह गरम पाणी, इंटरनेट, व्यायामशाळा आणि गरजेनुसार वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्कॉलरशिप योजनेची सुविधाही उपलब्ध आहे. या शिवाय केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला प्रतिसाद म्हणून २०२० पासून महाविद्यालयाने कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महाविद्यालयात प्रथम आणि थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या कोकणातील विद्यार्थ्यांना एक वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येते.

----प्रतिनिधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT