कोकण

रत्नागिरी ः हनुमान तिब्बा रत्नागिरीच्या अरविंदने केले सर

CD

फोटो ओळी
- rat१८p२८.jpg-P२३M१६९५५ माऊंट हनुमान तिब्बा सर करणारे क्लायंबर्स.
- rat१८p२९.jpg-३M१६९५६ अरविंद नवेले
------------

रत्नागिरीच्या अरविंदने केले सर हनुमान तिब्बा

५ हजार ९८२ मीटर उंचीचे अवघड शिखर; पाचवेळा संकटांचा सामना

मोहिमेत
* जिल्ह्यातील पहिला पर्वतारोही
* सातजणांचे पथक
* प्रतिकूल परिस्थितीचा सामना

रत्नागिरी, ता. १८ ः हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पांजल रांगेच्या मध्यवर्ती असलेले, सर्वात उंच आणि अत्यंत अवघड माऊंट हनुमान तिब्बा हे ५ हजार ९८२ मीटर (१९ हजार ६२६ फूट) उंचीचे शिखर रत्नागिरीतील जिद्दी माऊटेनिअरिंगच्या अरविंदे नवलेने सर केले. हे शिखर सर करणारा जिल्ह्यातील पहिला क्लायंबर्स ठरला. मोठ्या प्रमाणात पाऊस, बफवृष्टी, साधारण १००च्या गतीने वाहणारे हिमवारे, अंधुक प्रकाश, पाण्याची आणि ऑक्सिजनची कमतरता असे निसर्गाचे अवघड टप्पे त्यांनी पार केले. चढाई करताना पाचवेळा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.
हनुमान तिब्बा शिखर मोहिमेत अरविंदबरेाबर मंगेश कोयंडे, अमोल आळवेकर, अरविंद नवेले, मोहन हुले हे चार क्लायबिंग सदस्य आणि विशाल ठाकूर, गोपाळ ठाकूर, भागचंद ठाकूर हे गाईड अशा ७ जणांनी शिखर माथा गाठण्याची कामगिरी ५ जुलैला केली. मोहिमेतील एकमेव महिला सदस्य राजश्री जाधव-पाटील यांनी १६ हजार फुटांपर्यंत मजल मारली. त्यांना प्रेम ठाकूर (आचारी) यांचीही साथ मिळाली. या मोहिमेतील अवघड समाजाला जाणारा टेंटू पास टीमने लिलया पार केला. मोहिमेबाबत ''सकाळ''शी सवांद साधताना अरविंद म्हणाले, २२ जून ते ६ जुलै या कालावधीत ही मोहीम पार पाडली. धोंदी गावातून प्रत्यक्ष चढाईला आरंभ झाला. खडतर अशा मार्गावर टेंट २ पास येथे आम्ही सुरक्षित ठिकाणी पोचलो आणि मागे अचानक हिमस्खलन झाले. नशीब जोरावर असल्यामुळेच आम्ही सुरक्षित राहिलो. बर्फावरून चालताना काहीवेळा एक ते दीड फूट बर्फात पाय जात होते. दहा पावले चालायचे, दम घ्यायचा आणि पुढे जायचे, असा प्रवास केला. चालताना दमछाक होत होती. प्रतिकूल वातावरणामुळे शेवटच्या टप्प्यात जेवण संपले. सूप, मॅगी, चहा किंवा कॉफी यावर दिवस काढावा लागला. याचवेळी उलटीही झाली; पण अनुभव गाठीशी असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राखत शिरापर्यंत पोचलो. समोर फक्त बर्फाची चादरच घातल्यासारखे दिसायचे. शिखरापासून काही अंतरावर आलो असताना मार्ग सापडत नव्हता. समोर चढाई करण्यासाठी बर्फातील ३ मार्ग दिसत होते. त्यातील दोन मार्ग काही अंतरावर जाऊन ब्लॉक झाले होते. तिसर्‍या मार्गावर ९० अंशातील एक चढ होता. तेथून शिखर सर करण्यात यश मिळाले. हा प्रवास रात्रीच्यावेळी केला. दिवसा बर्फ वितळून चालणे शक्य नव्हते. थंडीमुळे कडक झालेल्या बर्फातून चालणे त्यापेक्षा सोपे झाले. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने संकटावर मात करत सुरक्षितरित्या शिखर गाठले; परंतु आमच्यानंतर शिखर चढाईसाठी गेलेल्या एका पथकाला दुर्घटनेला सामोरे जावे लागले.
----
चौकट
असा केला महापुराचा सामना
परतीच्या प्रवासात मनालीसह हिमाचल प्रदेशातील महापुराचा सामना करावा लागला. पावसामुळे दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले पार करत यावे लागले. बियास नदी ओलांडून पुढे आल्यानंतर काही वेळात दोन्ही मार्ग जोडणारा पूल वाहून गेला. पुरामुळे गोंधळाची परिस्थिती होती. वीज नव्हती, मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद होती. पाणी, इंधन, फळे आणि भाजीपालाही नव्हता. यावर मात करत १५ जुलैला सर्व मुंबईत परतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT