कोकण

टुडे १ संक्षिप्त

CD

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे साने यांना मदत

रत्नागिरी : राजापूर येथे अलिकडे लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगणक साहित्याचे नुकसान झाले. यामुळे नवउद्योजक केदार नारायण साने यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना तत्काळ मदतीची गरज असल्याने रत्नागिरीच्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने त्यांना १० हजार रुपयांचे अर्थसाह्य केले. मंडळाने त्वरित निर्णय घेऊन धनादेशाद्वारे ही रक्कम त्यांना दिली.


राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी
बाबाजी जाधव यांची निवड
खेड ः राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदाची धुरा बाबाजी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली. मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे नियुक्तीपत्र त्यांना दिले. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर जाधव यांनी काही दिवस वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या भूमिकेकडे नजरा खिळल्या होत्या. मुंबई येथे झालेल्या पवार गटाच्या बैठकीदरम्यान जाधव यांनी उपस्थिती दर्शवत पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जाधव यांच्या झालेल्या नियुक्तीनंतर नेमके कोणत्या गटात सामील व्हायचे? असा पेच कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला असला, तरी बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटातच सामील होण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांतच जिल्हाध्यक्ष जाधव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची शक्यता आहे. या नियुक्त्या झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT