कोकण

धामापूर परीसरात आठ फुटी मगर

CD

17010
धामापूर ः भगवती मंदिर परिसरात वाहनचालकांना दिसलेली मगर.

धामापूर परीसरात आठ फुटी मगर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः मालवण-कुडाळ मार्गावर धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर काल (ता.१७) मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान सहा ते आठ फूट लांबीची एक मोठी मगर मालवण येथील वाहन चालकांना आढळली. या परिसरात मगरीच्या दर्शनामुळे धामापूर तलावातील मगरींचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रात्री रस्त्यावर मगर दिसताच वाहनचालकांनी त्यांचे मित्र व स्थानिक रहिवाशी ॲड. कन्हैया निवतकर यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी ॲड. निवतकर, सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना मगरीच्या संचाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार आज दुपारी वनरक्षक एस. एम. कांबळे, वनपाल राठोड यांनी धामापूर येथे जात मगर दिसलेल्या परीसराची पाहणी केली. यावेळी सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, प्रशांत गावडे, महेश परब हे उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाशांनी धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच तलावाच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन वनरक्षक एस. एम. कांबळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT