कोकण

वरवेलीतील बेकायदेशीर उत्खनन बंद करावे

CD

७ (टुडे पान १ साठी, सेकंड मेन)

-rat३१p३०.jpg ः
२३M२०१५९
वरवेलीतील वादग्रस्त दगडखाण.
-rat३१p३१.jpg ः
२३M२०१६०
अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार भास्कर जाधव.
-------
वरवेलीतील बेकायदेशीर उत्खनन बंद करा

आमदार जाधव यांची लक्षवेधी ; खाणमालकाकडून दिशाभूल

गुहागर, ता. ३१ ः तालुक्यातील येथील वरवेली येथे नियमांचे उल्लंघन करून काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे. याबाबत खाणमालकाने अधिकाऱ्यांसह सरकारची दिशाभूल केली आहे. सुरूंग लावल्याने परिसरातील ग्रामस्थांची घरे, गोठे, मंदिरे, शाळा यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर उत्खनन बंद करावे, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात केली.
वरवेली येथील काळ्या दगडांचे उत्खनन, त्यासाठी रात्री-अपरात्री लावले जाणारे सुरूंग, या सुरूंगांमुळे परिसरातील घरे, गोठे, मंदिरे, शाळा यांना गेलेले तडे, नियमांचे उल्लंघन करून डंपरद्वारे होणारी दगडांची वाहतूक यामुळे वरवेली, मळण परिसरातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून, प्रशासनाने कारवाई करूनही खाणमालक कोणालाच जुमानत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी हा प्रश्न जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्याकडे नेला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जाधव आणि आमदार आशिष शेलार यांनी वरवेलीतील बेकायदेशीर उत्खननाबत लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना महसुलमंत्र्यांनी ही खाण बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आमदार जाधव यांनी याच उत्खननाबाबत लक्षवेधी मांडली. ते म्हणाले, उत्खननामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती, नागरिकांचे घरे, मंदिरे, गोठे, शाळा यांना तडे जाऊन फार नुकसान झाले आहे. अद्यापही एकाही व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. खाणमालकाने राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे एक खाण बंद केली; मात्र तेथूनच सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर कोणतीही परवानगी न घेता दुसरी खाण सुरू केली आहे. बंद खाण दाखवून खाणमालक प्रशासनाची आणि सरकारची दिशाभूल करत आहेत. नियमांचे उल्लंघन करून रात्रंदिवस दगड उत्खननामुळे परिसरात प्रचंड धूळ उडून ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. खाणीतील अनियंत्रित स्फोटांमुळे गावातील घरे, शाळा आदी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खाणी नियमबाह्य असल्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्यात शासन टाळटाळ करत आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालून खाणीची व परिसरातील घरांची वस्तुनिष्ठ पाहणी करावी. किमान पावसाळा संपेपर्यंत ही खाण बंद करावी, अशी मागणी लक्षवेधीद्वारे आमदार जाधव यांनी अधिवेशनात केली. पावसाळी अधिवेशनात वरवेली व अन्य गावांची समस्या मांडल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार जाधव यांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT