कोकण

''सावंतवाडी-शिरोडा-फणसखोल बस फेरी पूर्ववत सुरू करा''

CD

२०१३१

‘सावंतवाडी-शिरोडा-फणसखोल बसफेरी पूर्ववत करा’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद असलेली सावंतवाडी शिरोडा मार्गे-फणसखोल एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा, अशी मागणी धाकोरे ग्रामस्थांच्यावतीने येथील आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली. दरम्यान, उद्यापासून ही बस फेरी सुरू केली जाईल, असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी शिरोडा-फणसखोल ६ वाजता येणारी एसटी बस सेवा बंद केली आहे. त्यामुळे आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, वेंगुर्ले येथे जाणाऱ्या ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ही गाडी शिरोडा येथे थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बस सेवा गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. या सेवेमुळे गरीब होतकरू मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे ती तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस, ग्रामपंचायत सदस्य भारती मुळीक, दत्ताराम पालव, मनाली आसोलकर, अल्पेशा तोरस्कर, रत्नाकर मुळीक, श्वेता वैज, सोनू गवस, उमेश मुळीक, भानुदास कळसुलकर, सद्गुरू चराटकर, राजाराम नाईक, जयवंत मुळीक, सुनील मुळीक, समीर मुळीक, सानवी मुळीक, भिकाजी परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT