कोकण

पाककला स्पर्धेस मालवणात प्रतिसाद

CD

20233
मालवण ः पौष्टिक आहार पाककला स्पर्धेतील विजेत्या आरती वरक यांना अभय कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पाककला स्पर्धेस मालवणात प्रतिसाद

आरती वरक प्रथम; ‘रोटरी’तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

मालवण, ता. ३१ : यंदाच्या मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या येथील रोटरी क्लबतर्फे कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन येथे आयोजित केलेल्या ‘पौष्टिक आहार पाककला’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आरती वरक (मिक्स मिलेट उतप्पा व भोपळा-गाजराची चटणी) विजेत्या ठरल्या. द्वितीय क्रमांक प्रियांका पाटणे (धपाटे व पडवळीच्या बियांची चटणी), तृतीय क्रमांक माधुरी सामंत (चवदार पौष्टिक भाजी व मिश्र पिठाचे थालीपीठ) यांनी मिळविला.
स्पर्धेचे उद्‍घाटन अन्नपूर्णेचे पूजन करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारमाठचे उपसरपंच जीवन भोगावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय कदम, रोटरीच्या डॉ. लीना लिमये, ऋषिकेश पेणकर, रतन पांगे, अनिल चव्हाण, अभय कवटकर, रमाकांत वाक्कर, विनय गावकर, भाऊ साळगावकर, मनोज रावले, सुविधा तिनईकर, तनिष्का कासवकर, अन्वेशा कदम, रश्मी वाक्कर, प्रणाली चव्हाण आदी उपस्थित होते.
स्पर्धेत वरी, बाजरी, ज्वारी, नाचणी यापासून बनविलेला पदार्थ, तसेच आयोजकांनी निवडून दिलेल्या भाज्यांपासून पदार्थ बनवायचा होता. यात ३० महिला स्पर्धकांनी सहभाग घेत बनविलेले विविध पदार्थ सादर केले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. गार्गी ओरसकर व रतन पांगे यांनी केले. डॉ. लीना लिमये यांनी सूत्रसंचालन केले. प्रथम विजेत्यास ११११ रुपये व रोटरी क्लबतर्फे चषक, द्वितीय क्रमांकास ९९९ रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ७७७ रुपये व रोटरी क्लबतर्फे चषक अशी पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT