कोकण

कणकवली, वैभववाडी स्थानकांच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करा

CD

kan313.jpg
M20193
मुंबई : येथील एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची शिवसेना जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल उपस्थित होते.

कणकवली, वैभववाडी स्थानकांच्या
दुरूस्तीसाठी निधीची तरतूद करा
शिवसेनेची मागणी : संचालक शेखर चन्ने यांना निवेदन
कणकवली, ता. ३१ : कणकवली आणि वैभवववाडी बसस्थानकांची मोठी दूरवस्था झाली आहे. या बसस्‍थानकांच्या दुरूस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करा अशी मागणी शिवसेना जिल्‍हाप्रमुख संजय आग्रे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना दिले.
दरम्‍यान पुढील काही दिवसांत सिंधुदुर्गात येऊन दूरवस्था झालेल्‍या बसस्थानकांची पाहणी केली जाईल. त्‍यानंतर एस. टी. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी ग्‍वाही श्री. चन्ने यांनी दिली असल्‍याची माहिती श्री. आग्रे यांनी दिली.
संजय आग्रे म्‍हणाले, कणकवली बसस्थानक आणि तेथील इमारत पन्नास वर्षापूर्वी बांधण्यात आल्‍या. या इमारती आता मोडकळीस आल्‍या आहेत. तसेच बसस्थानक परिसरात सांडपाण्याची व्यवस्था नाही. प्रवाशांनाही अपुरी निवारा शेड आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशीच परिस्थिती वैभववाडी बसस्थानकाची आहे. त्‍यामुळे या दोन्ही बसस्‍थानकांचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी एस. टी. च्या व्यवस्थापकी संचालकांकडे ही केली आहे. याबाबत त्‍यांच्याशी चर्चा करून निवेदनही दिले आहे.
दरम्‍यान देवगड आणि वेंगुर्ले बस स्थानक नूतनीकरणासाठी प्रत्येकी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे आता निविदा काढून तातडीने पूर्ण करून घ्यावीत. तसेच या कामांसाठी सक्षम ठेकेदार नेमण्यात यावा, अशीही मागणी संजय आग्रे यांनी केली. त्‍यांच्यासोबत कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT