कोकण

-तालिमखाना-जवाहरचौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

CD

२२ (पान २ साठी)


-rat३१p२०.jpg ः
२३M२०१२८
राजापूर ः रस्त्यामध्ये पडलेले खड्डे.
--------------
तालिमखाना-जवाहरचौक रस्त्यावर खड्डेच खड्डे

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या शहरातील तालिमखाना ते जवाहर चौक या रस्त्याला पहिल्याच पावसात काही ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला डिपॉझिट परत करू नये, अशी मागणी माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी यापूर्वीचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून तालिमखाना ते जवाहर चौक रस्त्याच्या कामासाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वी पहिल्याच पावसात रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून ये-जा करणारे पादचाऱ्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शाळेत ये-जा करणाऱ्‍या मुला-मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कमाकडे पालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जात असल्याचा आरोपही नार्वेकर यांनी केला आहे. श्रावण महिना संपल्यानंतर दहीकाला, गणेशचतुर्थी हे महत्वाचे सण येणार असून यापूर्वी हा खराब झालेला रस्ता दुरुस्त व्हावा, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले त्याच्याकडून रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी आणि त्याशिवाय डिपॉझिटची रक्कम परत करू नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT