कोकण

बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करणार

CD

बालकांमधील मृत्यू,आजाराचे प्रमाण कमी करणार

मिशन इंद्रधनुष ५.० मोहिम ; लसीकरणासाठी बालकांची शोध मोहिम

रत्नागिरी, ता. ३१ ः बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी साधन आहे. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ पासून तिन फेर्‍यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष ५.० लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही बालक या लसीकरण मोहीमेपासून वंचित राहू नये यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जावून सर्व्हे करणार आहेत, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.
मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीकरता मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा झाली. यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेत गरोदर माता व शून्य ते ५ वर्ष वय असलेले बालके, लसीकरणापासून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी आहेत. यांचा शोध घेवून त्यांना लसीकरण करावयाचे आहे. याबाबत सर्व आरोग्य संस्थांना यासंबंधित माहिती देण्यात आली आहे आणि आरोग्य संस्थाकडून माहिती घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. ही मोहिम तीन टप्पांमध्ये दि.७ ते १२ ऑगस्ट २०२३, ११ ते १६ सप्टेंबर २०२३, ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान राबवली जाणार आहे. लसीकरण सत्राचे नियोजन शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात केले जाईल. सर्व सत्रे यु-विन अ‍ॅपवर तयार करण्यात येणार आहेत. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी या मोहिम कालावधीमध्ये आपले अर्धवट राहिलेले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT