22288
सिंधुदुर्गनगरी ः वडिलोपार्जित जमिनीमध्ये हक्क मिळण्याबाबत अर्जुन गोडकर यांनी उपोषण केले.
वडिलोपार्जित जमिनीत
हक्कासाठी ‘घंटानाद’
सिंधुदुर्गनगरी येथे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा आणि या जमिनीमध्ये अनधिकृतरित्या करण्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे, या मागणीसाठी आरवली-सखैलेखोल (ता. वेंगुर्ले) येथील शैलेश अर्जुन गोडकर यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.
याबाबत दिलेल्या निवेदनात गोडकर यांनी म्हटले आहे की, आरवली-सखैलेखोल येथे आपली वडिलोपार्जित जमीन आहे; मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर या जमिनीतील नावे आपले काका यांच्या सांगण्यावरून संबंधित तलाठ्याने परस्पररित्या संगनमताने कमी केली. या जमिनीतील काही भाग विक्री केला असल्याचे गोडकर यांचे म्हणणे आहे. या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आपल्याला हक्क मिळावा, यासाठी आई अंजनी गोडकर आणि ते स्वतः गेली १५ वर्षे पाठपुरावा करत आहेत; मात्र त्यांच्या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. शिवाय जमीन विक्री केलेल्या जागेत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पाडावे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे; मात्र यावर कार्यवाही झाली नाही. याबाबत मंत्रालय पातळीवरही लक्ष वेधले, अनेकवेळा आंदोलने करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा आज घंटानाद आंदोलन जिल्हा परिषद समोर केले. याची प्रशासनाने दाखल घेऊन या प्रकरणी सर्व वारसांची एकत्रित सुनावणी घेऊन योग्य न्याय द्यावा. आजच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास १५ ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशाराही गोडकर यांनी प्रशासनास दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.