कोकण

दापोली बसस्थानकातील गैरसोयीबाबत उपोषण

CD

२२ (टूडे २ साठी)

दापोली बसस्थानकातील गैरसोयींबाबत उपोषण

दाभोळ, ता. २१ ः दापोली बसस्थानकात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत मराठी पत्रकार परिषद शाखा दापोली यांच्यावतीने १ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
दापोली हे एक महत्वाचे आगार आहे. दापोली हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेला तालुका आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय दापोलीत असल्याने अनेक प्रवासी दापोली बसस्थानकातून प्रवास करतात. असे असूनही दापोली बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच आगारामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. दापोली बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बसेसना गळती लागली असून, त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्या वारंवार बिघडत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. शिवशाही बसेसमधील वातानुकूलित यंत्रणा अनेकवेळा बंद पडते. मुंबई महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या बसेस आपटून नादुरुस्त होत आहेत. या बसेस अन्य आगारांमध्ये वर्ग करून दापोली आगाराला नव्या प्रकारच्या हिरकणी बसेस देण्यात याव्यात.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये यांत्रिकीविभागाची अनेक पदे रिक्त असल्याने महामंडळाच्या बसेसची दुरुस्तीची व अन्य कामे वेळीच होत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती करावी. दापोली बसस्थानकातून सकाळी ६.३०ची जलद रत्नागिरी, ७ ची पुणे-शिर्डी, सकाळी ९ ची दापोली-अक्कलकोट, सायंकाळी ७ ची दापोली-अक्कलकोट, दुपारी १२ची उन्हवरे मुंबई व २ ची दापोली-कोल्हापूर या बसेस प्रवाशांच्या मागणीनुसार त्वरित सुरू करण्यात याव्यात अन्यथा १ सप्टेंबरपासून आगारासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT