कोकण

पिकविमा योजनेत संगमेश्वर तालुका अग्रेसर

CD

२६ (टूडे २ साठी, मेन)

rat२१p१७.jpg ः
OP२३M२४८१२
साखरपा ः पिकविमा योजनेत ऑनलाइन नोंदणी करताना बापू शिंदे.

पिकविम्यात संगमेश्वर तालुका अग्रेसर

बापू शिंदेंचे विशेष प्रयत्न ; प्रचारासाठी बनवला रथ


साखरपा, ता. २१ ः शासनाकडून जाहीर झालेल्या एक रुपयांत पिकविमा योजनेला संगमेश्वर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातून तब्बल ५ कोटी २५ लाखांचा विमा उतरवण्यात आला आहे. यासाठी भडकंबा येथील कृषी संचालक बापू शिंदे यांनी विशेष मेहनत घेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यावर भर दिला होता.
शासनाकडून एक रुपयात भात व नाचणी पिकविमा योजना राबवण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या पिकाचा विमा एक रुपयात काढण्याची संधी उपलब्ध झाली होती. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साखरपा शिवसेना व रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत शिंदे यांनी स्वःखर्चातून शेतकरी सेवारथ बनवला. त्या द्वारे गावागावात व वाडीवस्तीपर्यंत जाऊन शेतकरी ऑडिओ स्पीकरद्वारे बांधवांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रथमच ही योजना सुरू असल्याने अनेक शेतकरी बांधव संभ्रमात होते; परंतु या जनजागृतीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळीच समजल्याने याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना झाला. या योजनेतून संगमेश्वर तालुक्यातून सुमारे ४ हजार शेतकऱ्यांनी आपले ११०० हेक्टर क्षेत्र पिकविम्याच्या माध्यमातून संरक्षित केले व ५ कोटी २५ लाख रुपयांचा विमा उतरवला. यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे व त्यांचे सहकारी सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व तालुक्यतील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन आपला संगमेश्वर तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवला. या योजनेसाठी कृषी संचालक बापू शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक खासदार विनायक राऊत यांनी केले.
----
आपत्तीमधील नुकसानीपोटी मदत

जिल्ह्यात खरिपामध्ये भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षात अवेळी पावसामुळे भातशेतीचे कापणीच्यावेळी मोठे नुकसान होते. दोन वर्षांपूर्वी कापलेले भात वाहून गेले. या वेळी विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. त्याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळाला. कोकणातील पिकनोंद चांगली असल्यामुळे विमा भरपाई मिळत नसल्याने शेतकरी विमा योजनांकडे दुर्लक्ष करतात; मात्र आपत्तीमधील नुकसानीपोटी आर्थिक मदत दिली जाते, हीच बाब कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली गेली. त्यामुळे यंदा प्रतिसाद लाभल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

दृष्टीक्षेपात...

* ४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
* ५ कोटी २५ लाखांचा उतरवला विमा
* शेतकऱ्यांच्या दारापर्यंत अधिकारी
* योजनेचे महत्व समजावून दिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT