कोकण

पावसमधील मनसे कार्यकर्ते ताब्यात आणि सुटका

CD

३३ (पान २ साठी)

पावसमधील मनसे कार्यकर्त्यांची सुटका

तोडफोडीमुळे दक्षता ; शांततेचे आवाहन

पावस, ता. २१ ः राजापूर येथील हातिवले टोल नाका, पाली येथील कार्यालय फोडल्यानंतर कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पावस परिसरातील मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. काही काळानंतर त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहन चालकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे ते बंद करण्यासाठी अज्ञातानी टोल नाक्यांची तोडफोड केली. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात शांतता निर्माण व्हावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पावस परिसरातील मनसैनिकांना शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यांना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने योग्य त्या सूचना देऊन दुपारी अडीच वाजता त्यांना सोडण्यात आले. या संदर्भात पोलिस अंमलदार संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावस परिसरामध्ये शांतता असताना त्याला गालबोट लागू नये यासाठी मनसैनिकांना परिसरामध्ये वातावरण बिघडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT