कोकण

गरीब मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्‍न हवे

CD

24837
बावशी : येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बावशीतील शिक्षकांचा सत्‍कार करण्यात आला.

गरीब मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्‍न हवे

मधुकर मातोंडकर : बावशी प्रतिष्‍ठानतर्फे गावातील शिक्षकांचा सत्‍कार

कणकवली, ता.२१ : ग्रामीण भागातील शिक्षक तसेच इतर घटकांनीही गरीब घटकातील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्‍न करायला हवेत. ही पिढी जर शिक्षणापासून वंचित राहिली तर उद्याची पिढी आपणाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक मधुकर मातोंडकर यांनी केले.
बावशी (ता.कणकवली) येथे बावशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रतिष्‍ठानतर्फे गावातील शिक्षकांचा सत्‍कार झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.मातोंडकर बोलत होते. यावेळी शाळेतील शिक्षक विनोद ठाकूर, दिनेश पाटील, अंगणवाडी सेविका स्वप्नरेखा एकनाथ कांडर, सहायक नर्मदा नामदेव मर्ये, राजश्री शिवराम गुरव यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक मार्गदर्शक कवी अजय कांडर, अध्यक्ष विलास कांडर, उपाध्यक्ष मोहन खडपे, कार्यवाह समीर मयेकर, सहकार्य संजय राणे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सुवर्ण राणे, मनीषा राणे, श्रीकृष्ण नानचे तसेच दर्पण सांस्कृतिक चळवळीचे माजी अध्यक्ष किशोर कदम, नेहा कदम, विजय कांडर, पंढरी सावंत, ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांडर, वनिता कांडर, सुहासिनी कांडर, सुनिता कांडर आदी उपस्थित होते.
कवी अजय कांडर म्हणाले, ‘‘प्रतिष्‍ठानतर्फे प्रामुख्याने गावच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि सांस्कृतिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. इथली मुलं जर उच्च शिक्षण घेत नसतील तर ते अपयश गावातील आजच्या पिढीचे आहे. चांगली मुलं चांगली शिकायची असतील तर त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा द्यायला हवी. त्यामुळेच या गावातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.’’ यावेळी विनोद ठाकूर दिनेश पाटील, श्रीकृष्ण नानचे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले. विलास कांडर, मोहन खडपे, संजय राणे, शिवराम गुरव, सुवर्णा राणे, मनीषा राणे यांनी ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. समीर मयेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT