फोटो ओळी
-rat21p36.jpg-KOP23M24921 राजापूर ः व्यायाम स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.
व्यायाम स्पर्धांना राजापुरात उत्तम प्रतिसाद
राजापूर, ता. २१ ः हौशी शरीरसौष्ठव संघटना राजापूर व राजापूर नगर पालिका व्यायामशाळावतीने आयोजित विविध व्यायाम स्पर्धांमध्ये वेदांत तावडे, राज माने, ओंकार ओगले, अबिद हुना, हेमराज साखरकर यांनी प्रथम कमांक पटकावला आहे.
यामध्ये बैठका-लहान गट प्रथम वेदांत तावडे, द्वितीय विक्रांत सुतार व ओंकार करंबेळकर, तृतीय सुशील नवाळे व मयुरेश नवाळे तर निरंजन वाघरे यांनी उत्तेजनार्थ कमांक पटकावला. मोठा गट राज माने, आदित्य शिवलकर, ओंकार ओगले यांनी अनुकमे प्रथम तीन कमांक पटकावले. दंड प्रकारात प्रथम ओगले, द्वितीय विघ्नेश वादक, तृतीय रंजित जाधव यांनी तर नजरूर बोरकर, फैझान रहिम मुल्ला यांनी उत्तेजनार्थ कमांक पटकावला.
बेंचप्रेसमध्ये प्रथम अबिद हुना, द्वितीय विघ्नेश अमरे व प्रणय चोरगे, तृतीय हेमराज साखरकर यांनी तर नजरूर बोरकर, रंजीत जाधव, अक्षय जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. स्कॉटिंगमध्ये हेमराज साखरकर प्रथम, प्रणय चोरगे द्वितीय, विघ्नेश अमरे तृतीय तर रंजित जाधव, अभय पवार, नजरूर बोरकर, जैद गोवळकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांना अॅड. गुरूप्रसाद शिवलकर यांनी वडील भास्कर शिवलकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केलेले चषक देऊन गौरवण्यात आले तसेच या वेळी कॅरममध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यसंघात निवड झालेल्या निधी सप्रे, राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सत्यवान लोळगे, जगदीश ठोसर, अनंत रानडे यांचाही सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.