कोकण

पावस-सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटला जयगडचा निसर्ग

CD

rat२७p३३.jpg
M२६२४१
जयगडः येथील गणेश मंदिराचे चित्र काढताना विद्यार्थी.
rat२७p३४.jpg-
२६२४२
गणेश मंदिराच्या परिसरात चित्रांच्या दुनियेत दंग झालेले विद्यार्थी.
---------

सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी रेखाटला जयगडचा निसर्ग
जेएसडब्ल्यूचे सहकार्य; पावसाळी सहलीत कुंचल्याची जादू, शेकडो निसर्गदृश्य साकारली
पावस, ता. २७ः तालुक्यातील जयगड येथील निसर्ग यावर्षीच्या पावसाळी सहलीत सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब रेखाटत त्यात भरलेल्या रंगांनी सारा परिसर कॅनव्हास आणि कागदावर जीवंत केला. या निसर्ग अभ्यास सहलीत कलाकारांनी निसर्गाची शेकडो दृष्ये रेखाटली.
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. यावर्षी ही सहल जयगड येथे नेण्यात आली. जयगड बंदर, किल्ला, कऱ्हाटेश्वर मंदिर, गणपती मंदिर ही सहलीची ठिकाणे होती. पहिल्यादिवशी सकाळी धुक्यामध्ये जयगड किल्ला तसेच मंदिर आणि सागर खाडी त्यावर पडणारी सूर्याची किरणे, त्यामुळे दिसणारे मनमोहक दृश्य विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमात ७० हून अधिक चित्रे कागदावर उमटवली. शैक्षणिक सहली दरम्यान नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार अशोक ढिवरे यांनी चित्र प्रात्यक्षिकाबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांच्या मनातील अगणित प्रश्नांचे निरसन केले.
कला विद्यार्थ्यांना चित्र सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या. चित्राबरोबरच पेन्सिल स्केच किती महत्वाचे आहे हे पटवून सांगितले. त्याचबरोबर कोकणचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव व प्राध्यापकांनी वेगवेगळ्या माध्यमात कामे केली. या सहलीची सर्व व्यवस्था जेएसडब्ल्यू कंपनीतर्फे करण्यात आली होती. कंपनीचे जेएसडब्ल्यु एनर्जी प्लांन्ट हेड पेदन्ना, सी. एस. आर. हेड अनिल दधिच, एच. आर राजीव जोशी, संपदा धोपटकर, मयूर पिंपळे आदींनी या सहलीसाठी मोलाचे सहकार्य केले.

चौकट
चित्रांचे भरणार पटवर्धन हायस्कूलमध्ये प्रदर्शन
या शैक्षणिक सहली दरम्यान मुलांनी काढलेली चित्रे प्रदर्शन स्वरूपात रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमधील कॅ. सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर यादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलाव स्वरूपात विक्री होणार आहे. सर्व कलाप्रेमी, कलारसिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के आणि कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT