rohit pawar sakal media
कोकण

Raigad: रोहित पवार तटकरेंचा वारू अडवणार? रायगड लोकसभा मतदारसंघाची मिळाली जबाबदारी

CD

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३०ः अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवर शरद पवारांनी आमदार रोहित पवार यांना उतरवले आहे. त्यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नातवापुढे तटकरे कुटुंबीयांचा वारू थांबवण्याबरोबरच भाजपला शह देण्याचे मोठे आव्हान असणार आहेत.

अत्यंत चाणाक्ष, मुत्सद्दी, राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या सुनील तटकरे यांचा रायगडच्या राजकारणावर आजही विशेष प्रभाव आहे. तेच स्वतः खासदार असून मुलगी आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री म्हणून त्या काम करत आहेत तर त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत. पक्षफुटीनंतर संघटनात्मक वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शरद पवार यांनी रोहित यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.


तटकरे यांनी अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाला मोठा फटका रायगडात बसला.

फुटीनंतर रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत खासदार सुनील तटकरे यांना पक्षाने आणि पवारांनी काय कमी केले, त्यांना देण्यात आलेली पद, मंत्रिमंडळामध्ये प्रदीर्घ काळ दिले गेलेली संधी तसेच कुटुंबाकडे असलेली सत्ता या सर्व गोष्टींचा उल्लेख करत तटकरेंवर टीकास्त्र सोडले होते.

त्याला तटकरेंनी सौम्य शब्दात प्रत्युत्तर दिले होते. आता थेट रायगड प्रभारी म्हणून आजोबांनी नातवावर जबाबदारी टाकल्याने आगामी काळात पवार विरुद्ध तटकरे असे चित्र कोकणात पाहायला मिळणार आहे. या जबाबदारीमुळे कोकणातील राष्ट्रवादीतील युवावर्गाला चांगले दिवस येतील, अशी चर्चाही रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT