कोकण

पिंगुळीत गुरुवारी दहीहंडी उत्सव

CD

पिंगुळीत गुरुवारी
दहीहंडी उत्सव
कुडाळ ः साई कला मंच, पिंगुळी आयोजित सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी पुरस्कृत दहीहंडी महोत्सव २०२३ चे आयोजन गुरुवारी (ता. ७) सायंकाळी चारला पिंगुळी-म्हापसेकर तिठा (आनंदवन कॉम्प्लेक्स कंपाऊंड) येथे केले आहे. पिंगुळी गावची सात थरांची मानाची दहीहंडी फोडणाऱ्या संघास २५,५५५ व आकर्षक चषक, सहा थरांची सलामी देणाऱ्या संघास ३,५०० रुपये व सन्मानचिन्ह, पाच थरांसाठी २,५०० रुपये व सन्मानचिन्ह, चार थरांची सलामी देणाऱ्या संघास १,५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या पिंगुळीतील व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. ढोलताशांच्या व डीजेच्या तालावर नृत्याविष्कार, आकर्षक विद्युत रोषणाईसह महिला गोविंदा पथकाचे खास आकर्षण आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे एलईडी स्क्रीनवर सादरीकरण होणार आहे.
................
‘जवाब दो’ आंदोलनास
जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा
कुडाळ ः जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले. सरकारच्या या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी उद्या (ता. ५) तालुकास्तरावर आणि बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने होणाऱ्या ‘जवाब दो’ आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आहे. आपल्या मागण्यांचा शांततेने पाठपुरावा करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठीमार करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. ज्यावेळी सरकार जनतेवर अन्याय करेल, त्यावेळी काँग्रेस पक्ष अन्यायाच्या विरोधात जनतेसोबत उभा राहील, असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.
.................
मराठा समाजतर्फे आज
तहसीलदारांना निवेदन
सावंतवाडी ः तालुका मराठा समाजाच्यावतीने उद्या (ता. ५) सकाळी अकराला जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकांवर लाठीमाराचा निषेध व्यक्त करून मराठा समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्व मराठा समाज बांधवांनी आरपीडी हायस्कूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाज तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उद्या एकाच वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी बहुसंख्य सदस्य, मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: ‘माझा स्वतःचा फोन सतत सायलेंट असतो...’; Zerodha चे संस्थापक नितीन कामथ यांनी सांगितलं यशामागील तत्वज्ञान

Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का! निवडणूक जिंकली तरी होणार नाहीत मुख्यमंत्री; भाजपने दिला नवा फॉर्म्युला

Dhananjay Munde: लोकसभेतील राड्याचा विधानसभेवर परिणाम! निवडणूक आयोगाने धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाची हायकोर्टाला दिली 'गॅरंटी'

Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT