प्रश्नमंजुषा स्पर्धेत दुर्वांक गावडेने प्रथम
कुडाळः नॅशनल स्टेम प्रोग्रॅम अंतर्गत एनएसपी २०२३-२४ प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये कुडाळ हायस्कूलच्या दुर्वांक गावडेने (सातवी) प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन लघूविज्ञान केंद्र व स्टेम एज्युकेशन यांनी केले होते. नॅशनल स्टेम प्रोग्रॅम अंतर्गत एनएसपी २०२२-२३ विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा नेहमीच शोध घेत असतात. यंदा प्रश्नमंजुषा या उपक्रमाचे आयोजन केले होते. एकूण सहा जिल्ह्यांचा मिळून मुंबई झोन तयार केला होता. या स्पर्धा नेरूळ (नवी मुंबई) या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेसाठी कुडाळ हायस्कूलच्यावतीने दुर्वांकने सहभाग नोंदविला होता. त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. दुर्वांक याला प्रशालेच्या सुशीलकुमार कडूलकर या विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक दिनेश आजगावकर, महेश ठाकूर, शेषकुमार नाईक यांनी दुर्वांकचे अभिनंदन केले आहे.
---------------
swt७७.jpg
M28774
सावंतवाडीः आशय शिंदेचे अभिनंदन करताना शिक्षक.
जतरण स्पर्धेत आशय शिंदेचे यश
सावंतवाडीः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा ओरोस क्रीडासंकूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या आशय शिंदे याने जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. आशयने १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात १०० मीटर फ्री-स्टाईलमध्ये प्रथम आणि ५० मीटर फ्री-स्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून विभागस्तरावर धडक मारली. त्याला त्याचे कोच दिपक सावंत आणि क्रीडा शिक्षिका श्रीमती मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला हेशागोळ यांनी त्याचे अभिनंदन केले.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.