Survey of kajirda road connecting Rajapur-Kolhapur Sakal
कोकण

Ratnagiri News : राजापूर-कोल्हापूरला जोडणाऱ्या काजिर्डा रस्त्याचे सर्वेक्षण

एक कोटीची तरतूद ; वाहतुकीसाठी सुरक्षित आणि शॉर्टकटही

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा अशा तिनही जिल्ह्यांना एकत्रितरीत्या जोडणारा राजापूर तालुक्यातील काजिर्डा घाट रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने हा रस्ता होण्यासाठी आमदार राजन साळवींसह अनेकांनी प्रयत्न केले होते.

राजापूर- कोल्हापूर जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटीची तरतूद यावर्षी अर्थसंकल्पात केली आहे. या रस्त्याच्या सर्व्हेक्षणाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याची निविदाही काढली आहे. हा रस्ता कोकणातून कोल्हापूर घाटमाथा परिसराला जोडणारा सुरक्षित आणि शॉर्टकट ठरणार आहे.

सुमारे तेराशे लोकवस्ती असलेला काजिर्डा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्गला कोल्हापूर अशा तिनही जिल्ह्यांना जोडणारा काजिर्डा घाटातून जाणारा मार्गही आहे. अणुस्कूरा घाटमार्ग होण्यापूर्वी काजिर्डा घाटातून रस्ता वाहतुकीला प्राधान्य दिले होते.

त्यादृष्टीने सत्तरीच्या दशकात सर्व्हेक्षण झाले होते. काही कारणास्तव काजिर्डा घाटरस्ता मागे पडून अणुस्कूरा घाटरस्ता झाला. त्यानंतर दुर्लक्षित राहीलेल्या काजिर्डा घाटाचे भाग्य उजळलेले नाही. काजिर्डा घाटातून जाणारा घाटरस्ता राजापूर-पाचल-मूर-काजिर्डा-पडसाळी-भोगाव करीत पुढे कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जातो.

अणुस्कूरा घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या तुलनेत काजिर्डा घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे सुमारे तीस-पस्तीस कि.मी.चे अंतर वाचते. वेळेसह खर्चाचीही बचत करणारा हा रस्ता राजापूर ते काजिर्ड्यापर्यंत झाला आहे.

पुढे पडसाळी ते भोगाव-कोल्हापूर असा झाला. मात्र, घाटातील काजिर्डा ते पडसाळी हा सुमारे साडेतीन कि. मी.चा रस्ता झालेला नसून त्याचा ग्रामस्थांकडून पायवाट म्हणून उपयोग केला जातो.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यापारी शेतमालासह अन्य विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यासाठी बैलांवरून ओझी वाहून राजापूरात येत होते. मालवाहतूक करणारे हे बैल शॉर्टकट मार्ग म्हणून काजिर्डा घाटातून कोकणामध्ये म्हणजे घाटाच्या पायथ्याशी येत होते. दळणवळणासह वाहतूकीसाठी सुरक्षित आणि वेळेसह पैशाची बचत करणारा काजिर्डा घाटरस्ता व्हावा अशी गेल्या कित्येक वर्षापासून काजिर्डा ग्रामस्थांची मागणी आहे.

श्रमदानातून रस्ता
काजिर्डावासियांनी स्वतः हातामध्ये टिकाव, फावडा अन् घमेल घेवून दोन वर्षापूर्वी घाटरस्ता तयार केला. श्रमदानातून रस्ता बनवण्यासाठी काजिर्डावासियांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेची मदत झाली. त्यांच्या या प्रयत्नातून काजिर्डा घाटरस्ता वाहतूकीसाठी काहीप्रमाणात मोकळा झाला आहे.

काजिर्डा घाटमार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला शासनाकडून मंजूरीही मिळाली असून हे काम निविदास्तरावर आहे. निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात काजिर्डा घाटमार्ग उभारण्याच्या दृष्टीने सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
- शंतनु दुधाडे, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT