32055
कुडाळ ः कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल. शेजारी सौरभ धर, सचिन हुंदळेकर, अरुण मर्गज, कल्पना भंडारी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
फिजिओथेरपी हा निरोगी आयुष्याचा महामार्ग
सौरभकुमार अग्रवाल ः कुडाळात सप्ताहाची उत्साहात सांगता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः शारीरिक व्यायामात सातत्य राखणारी फिजिओथेरपी उपचार पद्धती हा निरोगी आयुष्याचा महामार्ग आहे. औषधाचे दुष्परिणाम टाळून शारीरिक तंदुरुस्ती राखणारी वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी होय, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी सप्ताहाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांचे सहकारी ए.पी.आय. सचिन हुंदळेकर, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौरभ धर, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी. एड. महाविद्यालयाचे प्रा. परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी, सहयोगी प्रा. वैशाली ओटवणेकर आदी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक अग्रवाल म्हणाले, ‘‘वेदनामुक्त जीवनासाठी फिजिओथेरपीचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी विविध उपक्रमांतून समाजात पोहोचले पाहिजे; जेणेकरून फिजिओथेरपी उपचार पद्धती नागरिकांना ज्ञात होऊ शकेल. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने निरोगी आरोग्याची भविष्यातील मानवी गरज ओळखून कुडाळसारख्या शहरात सुरू केलेले फिजिओथेरपी महाविद्यालय ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे.’’
अग्रवाल यांनी संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासह महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त एसएसपीएम लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे मेडिकल सुपरिटेंडन्ट डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी सर्जरी व सर्जरीनंतर उपचार पद्धतीमध्ये ऑर्थोपेडिक उपचार पद्धतीचे अनन्यसाधारण महत्त्व विषद केले. सर्जरी केल्यानंतरच्या आरोग्यासाठी ऑर्थोपेडिक उपचार पद्धतीचे असणारे महत्त्व सांगून त्या उपचार पद्धतीची माहिती उपस्थितांना दिली. विविध प्रात्यक्षिकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.