33843
सावंतवाडी ः येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिरानंतर पालिका कर्मचारी, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी आदी.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विमा
उतरविणार ः मुख्याधिकारी
सावंतवाडी पालिकेतर्फे आरोग्य सुविधाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील पालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आज येथे दिली.
येथील पालिका आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छता विभागात काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची आज येथील कुटीर रुग्णालयात आरोग्य चिकित्सा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांची ईसीजी, एचआयव्ही, सीबीसी तपासणी करण्यात आली. यावेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. सागर जाधव, चिन्मय पिशवीकर, डॉ. अंबापूरकर आदी उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या स्वच्छता पर्यवेक्षक रसिका नाडकर्णी, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, अक्षय पंडित, निवेद कांबळे, शिवराम तवटे, सफाई कर्मचारी समीर कदम, विनोद काष्टे, मिलिंद तांबे, गौरेश वासकर, राजन जाधव, विजय कोटेकर, सतीश सांगलेकर, जयवंत जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.