२७ (टुडे पान २ साठी, सदर)
(२६ सप्टेंबर पान ६)
-rat२p२५.jpg ः
२३M३५१६६
डॉ. विश्वजीत मानकर.
--------
आरोग्य विचार - होमिओपॅथीचा--------लोगो
वृद्धापकाळा दरम्यानचे मनोविकार
मागील लेखामध्ये आपण बाल्यावस्था, तारुण्यदरम्याने सामान्यपणे जाणवणाऱ्या मनोविकारांबाबत विवेचन केले. आता मानवी जीवनातील संध्याकाळ अर्थात वृद्धावस्था आणि त्या दरम्याने सामान्यपणे जाणवणारे मनोविकार आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचाराबाबत विचार करू.
-डॉ. विश्वजीत मानकर
----
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात असंख्य अनुभव घेऊन आणि त्याच्या कटू गोड आठवणी आठवणींना सामोरे जाताना मानवी मनावर निरनिराळे परिणाम होत असतात व त्याचा परिणाम मनोविकाराच्या स्वरूपात पाहावयास मिळतो. अशा अवस्थेमध्ये सामान्यपणे निद्रानाश, समाजापासून अलिप्त राहण्याची इच्छा, खिन्नता, घनिष्ठ अवस्था, प्रचंड चिडचिड, वेड लागणे अशा स्वरूपामध्ये पाहावयास मिळतात. आयुष्याच्या या कालखंडात जीवनसाथी सोबत असल्यास या सर्व मानसिक अवस्थांना सामोरे जाणे सुसह्य असते; परंतु जीवनसाथी नसल्यास हे जगणे फारच अवघड होऊन जाते. अशा वेळी कारणानुरूप औषधयोजना करून रुग्णाला सुसह्य जीवन प्रदान करणे होमिओपॅथिक शास्त्रानुसार सहज शक्य आहे. कधी कधी या वयामध्ये असाध्य आजार जडलेले असतात ज्याचा मनावर परिस्थितीनुरूप परिणाम दिसत असतो. अशा शारीरिक आजारांवर योग्य उपचार करून रोग्याचे मनोबल वाढवणे होमिओपॅथीमध्ये सहजशक्य आहे किंबहुना होमिओपॅथिक शास्त्रच या शारीरिक व मानसिक लक्षणांची सांगड घालून रोग्याला रोगमुक्तीचा आनंद देऊ शकते. बदललेल्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीचा वृद्धापकाळामध्ये काय परिणाम होतो, हे आपण समजावून घेऊ. त्रिकोणी कौटुंबिक पद्धतीमध्ये वृद्ध आई-वडील अडगळ समजली जाते आणि अशा वेळेस आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. माझ्या वैयक्तिक जीवनात डॉक्टर म्हणून अनेकदा वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग येतो आणि त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना झोप उडवून टाकतात. साधारण वृद्ध रुग्ण शारीरिक तक्रारींसाठी समोर येऊन बसतो आणि आपुलकीने त्याची चौकशी केली असता असं लक्षात येतं की, यामध्ये शारीरिक व्याधी सौम्य आहे; परंतु मानसिक व्यथा आणि वेदना या खूप खोल आहेत. अशा मनस्थितीचा विचार करून निर्माण होणारी मानसिक लक्षणे म्हणजे मुले, नातवंडे यांच्यापासून विभक्त झाल्याने होणारे विरहाचे दुःख, कुटुंबापासून विलग होत असताना जे वाद होतात आणि मुलगा किंवा सुनेकडून घोर अपमान केला जातो. या अपमानाचे सल मनातून जात नाही. आपण उभ्या केलेल्या संसारातून आपणासच परागंद व्हावे लागते, याचा प्रचंड राग मनामध्ये घर करून राहतो. होमिओपॅथिक शास्त्रामध्ये या सर्व स्वतंत्र मानसिक यातनांसाठी मानसिक रोग लक्षण अशा प्रकारे विचार करून त्या प्रत्येक मनक्षोभासाठी स्वतंत्र औषध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.