कोकण

रत्नागिरी- शिवप्रतिष्ठान दुर्गामाता दौड

CD

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे
रत्नागिरीत दुर्गामाता दौड
रत्नागिरी, ता. १३ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरात श्री दुर्गामाता दौड घटस्थापनेला (ता. १५) सुरवात होणार आहे. रत्नागिरी शहरातील विविध भागातून ही दौड निघणार आहे. गेली ११ वर्ष ही दौड काढली जात आहे. यामध्ये दौड करत दररोज देवीचे दर्शन घेतले जाते.
भारतमातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणारी शिवशंभू रक्तगटाची व राष्ट्रभक्तांची तरुण पिढी घरोघरी घडावी, देव, देश आणि धर्मरक्षणाच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या बाबतीत निद्रिस्त होत चाललेल्या हिंदू समाजाने खडबडून जागे व्हावे, यासाठी ही दौड काढली जाते. घटस्थापना ते विजयादशमी म्हणजेच या कालावधीत दररोज पहाटे ५.४५ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल, शिवतीर्थ येथून या श्री दुर्गामाता दौडला सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त धारकरी, हिंदूंनी यात सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष राकेश नलावडे यांनी केले आहे.
दौडचे वेळापत्रक असे (कंसामध्ये नवरात्रोत्सव मंडळाचे नाव) भेट १५ ऑक्टोबर- मारुती मंदिर, माळनाका, के. सी. जैन नगर, एकता मार्ग, मारुती मंदिर (अंबामाता मंदिर). १६ ला- मारुती मंदिर, माळनाका, मनोरुग्णालय रोड, जेल रोड, सन्मित्र नगर, मारुती मंदिर. (महापुरुष बालमित्र मंडळ, पोलिस महापुरुष तरुण मित्रमंडळ), १७ ला मारुती मंदिर, मजगाव रोड, चर्मालय, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनी, मारुती मंदिर. (क्रांतीनगर नवरात्र उत्सव मंडळ, महापुरुष मित्रमंडळ, समता नवरात्र उत्सव मंडळ), १८ ला मारुती मंदिर, पॉवर हाऊस, विश्वनगर, पॉलिटेक्निक रोड, मारुती मंदिर (विश्वनगर मित्रमंडळ), १९ ला मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, शिवाजीनगर, मारुती मंदिर (बालगोपाळ मित्रमंडळ), २० ला मारुती मंदिर, माळनाका, थिबा रोड, पॉलिटेक्निक रोड, हिंदू कॉलनी, मारुती मंदिर (थिबा पॅलेस रोड मित्रमंडळ), २१ ला मारुती मंदिर, अभ्युदयनगर, नाचणे, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारुती मंदिर (श्री नवलाई देवी मंदिर, नाचणे), २२ ला तेलीआळी नाका, पऱ्याची आळी, विठ्ठल मंदिर, टिळक आळी, गणपती मंदिर, झाडगाव नाका, श्री देवभैरी सहाण, शेरे नाका, लक्ष्मी चौक, मारुती आळी, तेलीआळी नाका (जोगेश्वरी मंदिर), २३ ला तेलीआळी नाका, आठवडा बाजार, भुते नाका, मांडवी नाका, घुडेवठार, चवंडे वठार, खडपे वठार, तेलीआळी नाका (जय भैरव नवरात्र उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, खडपे वठार), २४ ला मारुती मंदिर येथून दुचाकीवरून मांडवी रोड, राम मंदिर, किल्ला, भागेश्वर मंदिर येथून भगवती मंदिराला भेट देऊन श्री भगवती देवीचे दर्शन घेतले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT