कोकण

संजय राऊत यांनी समाजात चुकीची माहिती पसरवू नये

CD

संजय राऊत यांनी समाजात
चुकीची माहिती पसरवू नये

नितेश राणे ः अन्यथा वस्त्रहरण करू

कणकवली,ता. ३ ः भाजप,संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे. मराठा समाजात जरांगे पाटील यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवू नये. अन्याथा संजय राऊत यांचे वस्त्रहरण करू, असा इशारा भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, राऊत यांच्या घरातील महाभारत आम्ही सांगितले तर महाराष्ट्र त्यांचे तोंड बघणार नाही. ठाकरे व पवार कुटुंबियांत ज्या काड्या लावल्या त्यामुळे गलिच्छ राजकारण झालय. या सर्वांचा मुख्य सूत्रधार, शकुनी मामा संजय राजाराम राऊत आहे. भगव्याच्या नावाने राजकारण करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सर्वांत मोठे कलंक आहेत. भाजपची नीती तालिबान सारखी असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग झाल्यापासून ठाकरे व पवार कुटुंबियांत जे होतंय तो त्यांचा राग आहे. संजय राऊत स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पायघड्या घालून होता. जरांगेविषयी पत्रकात म्हटले आहे की, मनोज जरांगेना कोणीही अटक करणार नाही. उगाच कोण तुमचे कान भरत असेल तर त्याचे ऐकू नका. लागलेच तर तुमची बाजू सरकारकडे मांडू. तुमचा भाऊ सरकारमध्ये आहे, मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करून हिंदू समाजात वाद पेटवण्याचे काम जिहादी करत आहेत. त्याला आमच्यातील काही फितूर लोक मदत करत आहेत. राम मंदिरमुळे हिंदू एकत्र येतील, अशी भीती असल्याने आमच्यातील गद्दारांना एकत्र घेऊन जिहादी वाद निर्माण केला जात आहे, असा आरोप राणे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT