कोकण

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत वाफोलीत सार्वजनिक शौचालय

CD

49536
वाफोली ः शौचालयाचे उद्‍घाटन करताना युवराज लखमराजे भोसले. सोबत इतर मान्यवर.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत
वाफोलीत सार्वजनिक शौचालय

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाफोली मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिरनजीक शौचालय बांधण्यात आले आहे. यामुळे महिलांची व आबालवृद्धांची होणारी गैरसोय टाळण्यात आली. वाफोली येथील श्री देवी माऊली देवस्थानच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी गजानन धरणे, समूह समन्वयक अविनाश सावंत, सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे एन. एल. सावंत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब, सचिव राजाराम सावंत, सदस्य शिवराम परब, वाफोली देवस्थान समितीचे अध्यक्ष विलास गणपत गवस, सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, माजी सरपंच शिवाजी गवस, माजी सरपंच मारुती गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, सल्लागार विलास सावंत, सोसायटी चेअरमन धनश्री गवस, व्हाईस चेअरमन अनिल गवस, वाफोली हितवर्धक संस्था मुंबईचे माजी अध्यक्ष राजेंद्र राणे, वामन गवस, अंकुश गवस आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लखमराजे यांनी श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. अध्यक्ष गवस यांनी लखमराजे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT