Family life esakal
कोकण

Family life Problems : घर बघावे बांधून अन् मूल बघावे वाढवून...

२१ व्या शतकातले पालकत्व विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये अधिक जिकिरीचे बनत चालले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुलांमधले वाढते नैराश्य, व्यसनाधीनता, आत्महत्या, जोखमीचे वागणे, कुमारवयातले गर्भारपणा ही त्यांच्या बिघडत्या मानसिकतेची लक्षणे असू शकतात.

-डॉ. श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण (sajagclinic@gmail.com)

आजच्या जगात मुलाला वाढवणे हे पालकत्वाचा कस बघणारी गोष्ट ठरत आहे. जागतिकीकरणाआधी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये पालकांना इतर ज्येष्ठांची मदत व्हायची. २१ व्या शतकातले पालकत्व विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये अधिक जिकिरीचे बनत चालले आहे. वाढती स्पर्धा, गतिमान जीवन, आभासी तंत्रज्ञान, झपाट्याने होणारे सामाजिक, राजकीय, आर्थिक व पर्यावरणीय बदल यांचा परिणाम जीवनमानावर तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यावर (Health) होत आहे.

वाढत्या मानसिक समस्यांचे (Mental Problems) प्रमाण याचेच द्योतक आहे. मनोविकारतज्ज्ञ म्हणून लेखिका हे जवळून अनुभवते आहे. त्यासाठी सजग क्लिनिक ही एक आरोग्य चळवळ त्यांनी सुरू केली असून, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात सजगला यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. आरोग्यक्षेत्रातील प्रतिबंधनात्मक पावलांची उणीव सजग क्लिनिक आपल्या विविध उपक्रमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. निकोप समृद्ध पिढी घडवण्यासाठी आपला वाटा सामाजिक बांधिलकी म्हणून उचलणाऱ्या डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांचे सदर..

पालकांच्या जगण्यातले विविध ताणतणाव मुलांमध्ये पाझरल्याशिवाय राहात नाही. आपले मूल एकदाच मोठे होणार असते. या वाटेवर जरी अनावधानाने चुका झाल्या तरी त्याचे व्रण आयुष्यावर दिसल्याशिवाय राहत नाही. मूल मोठे होत असताना त्याला उबदार संस्कारक्षम वातावरण तसेच स्वतंत्र अवकाश मिळाले तर ती एक आनंदी व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी ठरू शकते. मानसतज्ज्ञ म्हणून कुटुंबाकडे बघताना जाणवते की, मुलांच्या वर्तन समस्यांचे मूळ ते वाढत असलेल्या कौटुंबिक वातावरणात असते.

येणाऱ्या काळातले ताण पचवण्यासाठी व एका सुदृढ शरीराबरोबर खंबीर मानसिकता घडवण्यासाठी मुलांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर उद्‌भवणाऱ्या समस्या समजावून घेण्याची व त्या टाळण्यासाठी काय करावे तेही समजून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारण पालकांसोबत वाढते शहरीकरण, जागतिकीकरण, विभक्त कुटुंबपद्धती, एकल पालकत्व, समलिंगी पालकत्व, अपंग पालकत्व अशा विविध आव्हानात्मक टप्प्यांवरचे पालकत्व समजून घेण्याची गरज भासते.

एक मूल घडवायला एक पूर्ण गाव लागते असे म्हणतात. विभक्त कुटुंबात घडणाऱ्या मुलांसाठी विविध माध्यमांनी जोडले गेलेली कुटुंबे हे आजच्या काळातले जागतिक पातळीवरचे गाव म्हणता येईल. विभक्त कुटुंबपद्धतीत जाणवणारी ज्येष्ठांची उणीव फेसबुक, यू ट्युब व इन्स्टावर मिळणाऱ्या पालकत्वाच्या धड्यांनी पूर्ण केली जात आहे. या विविध माध्यमांतून होणाऱ्या संस्कारांना बालमानसशास्त्राची जोड असणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच, हे माहितीस्रोत तपासून बघण्याची गरज आहे; अन्यथा समस्या सुटण्यापेक्षा आणखीन जटिल बनू शकते.

उलटपक्षी योग्य माहितीच्या आधारे एक पोषक आश्वासक वातावरण देऊन तसेच शेजारी, मित्र, शिक्षक व सहकारी यांच्या मदतीने मुलांची सर्वांगीण वाढ आजच्या आव्हानात्मक जगात पालक नक्कीच साधू शकतात. बालवयात अपुऱ्या देखरेखीअभावी मुलांमध्ये वर्तन समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. अपुऱ्या तयारीनिशी लादले गेलेले पालकत्व व अपुऱ्या मार्गदर्शनाअभावी घडलेले पालकत्वात शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. बहुतांश पालक मूल होण्याआधी गर्भसंस्कार व तत्सम गोष्टींचा अभ्यास करताना दिसतात.

मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आग्रही असतात; परंतु जसे मूल मोठे होते तसे कुठेतरी ही नाळ तुटताना दिसते. मूल घडवणे हे एक शास्त्र, अभ्यास व कला आहे. त्यासाठी गर्भारपणात जोडलेली आपल्या मुलाशी नाळ आयुष्यभर कशी तुटू नाही द्यायची हे पालकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. वाढत्या स्पर्धेच्या वातावरणात अभ्यासनामक गारूड पालकांवर अवेळी येऊन बसते. बाजारू अर्थकारण मुलाला रांगायच्या आधीच पळवण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि मूल उमलायच्या अगोदरच विविध ताणामुळे कोमेजून जाण्याची शक्यता वाढते.

मुलांमधील व पालकांमधील विसंवाद कुमारवयात पालकांची परीक्षा बघणारी ठरू शकते. मुलांमधले वाढते नैराश्य, व्यसनाधीनता, आत्महत्या, जोखमीचे वागणे, कुमारवयातले गर्भारपणा ही त्यांच्या बिघडत्या मानसिकतेची लक्षणे असू शकतात. या सर्व समस्या टाळण्यासाठी मार्गदर्शक या नात्यातून मुलांच्या व कुमारांच्या वर्तन समस्या व भावनिक समस्याबद्दल उहापोह करणार आहे.

(लेखिका मनोविकारतज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT