Rajan Salvi esakal
कोकण

आमदार साळवींच्या नेतृत्वात 143 लाखाचा पाणीटंचाई आराखडा तयार; 'या' गावांचा समावेश

लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंधारे बांधले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेली दोन वर्ष एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईची झळ पोहचली असली तरी तालुका टँकरमुक्त आहे.

राजापूर : एप्रिल-मेमध्ये भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरे जाण्यासाठी पंचायत समितीतर्फे आतापासून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने १४३ लाखाचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये ३७ गावे आणि १२४ वाड्यांचा समावेश आहे.

आराखड्यामध्ये समावेश असलेली गावे आणि वाड्यांमधील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन नळपाणी योजना तयार करणे, जुन्या नळपाणी योजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहीर बांधणे, सार्वजनिक विहीर वा साठवण टाकी बांधणे आदी उपाययोजनांचा समावेश केला आहे.

गेली दोन वर्ष एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईची झळ पोहचली असली तरी तालुका टँकरमुक्त आहे. अशी स्थिती असली तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईची झळा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचायत समितीने आतापासून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंधारे बांधले आहेत. त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

संभाव्य पाणीटंचाई आराखडाही प्रशासनाने केला आहे. या आराखड्यामध्ये सोलगाव, देवीहसोळ, पडवे, धाऊलवल्ली, नाणार, प्रिंदावण-बांदीवडे, जुवाठी, कशेळी, गोठणेदोनिवडे, परूळे, खरवते, ओझर, कोदवली, सागवे, कुंभवडे, मिळंद-सावडाव, येळवण, नाटे, अणसुरे, साखर, वाल्ये, सौंदळ, कोंड्येतर्फ राजापूर, दोनिवडे, हसोळतर्फ सौंदळ, झर्ये, मोसम, दळे, डोंगर, पांगरीखुर्द, कोंडसर बुद्रुक, आजिवली, महाळुंगे, उन्हाळे, खिणगिणी, मोगरे या गावांमधील विविध कामांचा समावेश आहे. टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

राजापूर आराखडा

  • एकूण गावेः ३७

  • एकूण वाड्याः १२४

  • अंदाजित रक्कमः १४३.२५ लाख

कामाचे स्वरूप प्रस्तावित योजना प्रस्तावित गावे प्रस्तावित वाड्या अंदाजित खर्च

  • विंधन विहिरी घेणे ७० २६ ७० ९०

  • नळपाणी योजना दुरुस्ती २ २ ३ २०

  • विंधन विहीर दुरुस्ती २ २ ३ १०

  • तात्पुरती पूरक पाणी योजना १ १ १ १०

  • नवीन नळपाणी योजना १ १ १ १०

  • सार्वजनिक विहीर पाणी योजना दुरुस्ती ३ ३ ४ १३

  • साठवण टाकी दुरुस्ती २ २ २ ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT