कोकण

चिपळूण पॉवरहाऊस येथील वाहतूक धोकादायक

CD

चिपळूण पॉवरहाऊस येथील वाहतूक धोकादायक
संजय तांबडे; सिग्नल, गतिरोधक, दिशादर्शक फलकांची गरज
चिपळूण, ता. ६ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पॉवरहाऊस येथील वाहतूक गुंतागुतीची ठरत आहे. या चौकात सातत्याने अपघात होत आहेत. त्यासाठी सिग्नल यंत्रणा, गतिरोधक, हायमास्क व दिशादर्शक फलक यासारख्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. शिवाय क्रॉसिंग सुरक्षेबाबत कामे मार्गी लावण्याची मागणी माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
येथील पालिकेने राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा अंदाज घेत बहादूरशेखनाका ते पागनाकादरम्यान उड्डाणपूल उभारण्याचा ठराव केला होता. या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत; मात्र तत्पूर्वी बहादूरशेखनाका ते पागनाका दरम्यानच्या रहदारीमुळे धोकादायक प्रवास बनला आहे. सातत्याने किरकोळ व मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी उड्डाणपूल मार्गी लागेपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने क्रॉंसिंगबाबतच्या उपाययोजना कराव्यात. याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी आणि शासकीय स्तरावर निवेदने आणि पत्रव्यवहार करून देखील गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यासाठी पाग पॉवरहाऊस चौक, गुहागर बायपास येथे सिग्नल यंत्रणा बसवावी, पाग शासकीय विश्रामगृह, गुहागर बायपास, पॉवरहाऊस चौक ते पाग बौद्धवाडीपर्यंत महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक उभारावेत. नागरिकांना क्रॉसिंग करता यावे असे झेब्राक्रॉसिंग पट्टे मारावेत. पाग पॉवरहाऊस चौक हा मोठा चौक जंक्शन बनला आहे. सध्या येथे एकच हायमॅक्स असल्याने रात्रीच्या वेळेस काळोख असतो. त्या वेळी क्रॉसिंग करताना धोकादायक होत आहे. गावातून येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्गावर जेथे ओपनिंग ठेवले आहे तिथे हायमॅक्स लावण्यात यावा.
पाग पॉवरहाऊस चौकात जेथे हायवेला गावातून येणाऱ्या नागरिकांसाठी ओपनिंग (क्रॉसिंग) ठेवले आहे तेथे थोडा पाऊस झाला तरी २ ते ४ फूट पाणी साठते. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होतात. त्यामुळे येथे उपायोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक तांबडे यांनी केली आहे. या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींमार्फत तसेच शासकीय स्तरावर वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा केला.

कोट
जनतेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी महिन्यात करावी अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
- संजय तांबडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT