चार दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून, सागरी मार्गही दृष्टिक्षेपात येणार आहे.
मंडणगड : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या बागमांडला-बाणकोट या खाडी पुलाच्या (Bagmandla-Bankot Bridge) कामाच्या जास्त उंचीच्या नवीन पुलाच्या निर्मितीच्या हालचाली सुरू आहेत. अर्धवट अवस्थेत असणाऱ्या आणि त्यावर कोट्यवधींचा खर्च केलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याने हा कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे.
रेवस रेड्डी सागरी महामार्गाला हिरवा कंदील मिळाल्याने या सागरी महामार्गावरील (Sagari Mahamarg) अर्धवट अवस्थेत असणाऱ्या पुलांची कामे पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा निर्माण झाली. यामुळे चार दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून, सागरी मार्गही दृष्टिक्षेपात येणार आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल. यातून रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल.
मुंबईतून तळकोकणात जाण्याचे अंतर कमी होईल. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग ठरू शकेल यासाठी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस-रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी मंजूर केलेला बागमांडला-बाणकोट सागरी सेतू याचाच अविभाज्य भाग होता; मात्र या मार्गावरील मोठ्या पुलांची कामे रखडली. त्याचे भूमिपूजन नोव्हेंबर २०१२ मध्ये झाले.
मे २०१६ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्याप ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. गेली ५ वर्षे पुलाचे काम बंद आहे. सुरवातीला बाणकोट खाडीवरील या सेतूसाठीचा अंदाजित खर्च १८२ कोटी रुपये होता. आता नव्याने त्याच पुलाच्या लगत नवीन पूल बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जास्त उंचीचा नवीन पूल रेवस रेड्डी प्रकल्पाअंतर्गत घेण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आधी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.