Supreme Court Justice Bhushan Gavai esakal
कोकण

Justice Bhushan Gavai : कोल्हापूर खंडपीठासाठी नेहमीच प्रयत्नशील; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची ग्वाही

‘देश विकसित आणि आत्मनिर्भर बनवायचा आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताचा क्रमांक येण्यासाठी प्रयत्न आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, अशी घटनेची रचना आहे.

देवगड : कोल्हापूर येथे सर्किट बेंच व खंडपीठ (Kolhapur Bench) करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती भूषण गवई (Justice Bhushan Gavai) यांनी येथे दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, अशी घटनेची रचना असल्याचेही ते म्हणाले. येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला समारंभ न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane), शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे (मुंबई) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, देवगड दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी नंदा घाटगे, अ‍ॅड. पारिजात पांडे, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. परिमल नाईक, अ‍ॅड. देवानंद गोरे उपस्थित होते.

न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘येथील जनतेला आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत जाणे खर्चिक आणि प्रसंगी परवडणारे नसते. यासाठी मागणीनुसार कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व खंडपीठ करण्यासाठी प्रयत्न राहतील. येथील इमारत सुसज्ज असेल.’ न्यायमूर्ती उपाध्याय म्हणाले, ‘येथील हापूस जगप्रसिद्ध आहे. येथे पर्यटनस्थळे आहेत. सध्याची इमारत ब्रिटिशकालीन होती. आता सर्वसोयींनीयुक्त अशी नवीन सुसज्ज अशी इमारत होईल.’

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, ‘देश विकसित आणि आत्मनिर्भर बनवायचा आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताचा क्रमांक येण्यासाठी प्रयत्न आहेत. महत्त्वाकांक्षी माणसे असल्यावर विकास होतो. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगल्यास न्यायालयात जावे लागणार नाही. यातून देश विकासाच्या वाटेवर जाईल.’ पालकमंत्री चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून आजवर दिलेल्या विविध विकास निधीची माहिती देऊन न्यायालय इमारतीचे अपेक्षित असलेले बांधकाम जलदगतीने करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले.

नूतन इमारतीचा आराखडा दृकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात आला. आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रांत जगदीश कातकर, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड उपस्थित होते. अरुण सोमण यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. देवानंद बोरे यांनी आभार मानले.

विजयदुर्गसाठी पाच कोटींचा निधी

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विजयदुर्गला सुमारे पाच कोटींचा निधी दिला जाईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. स्थानिकांची वेळोवेळची मागणी विचारात घेऊन कोल्हापूर खंडपीठ करून दिलासा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी मालवण आणि सावंतवाडी येथील न्यायालयाच्या इमारतींचेही नूतनीकरण होण्याची मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT