उपोषणाच्या सहाव्या दिवशी सकाळी भगवान कोकरे महाराजांनी गोशाळेतील गायी कळबंस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला.
चिपळूण : गायींना (Cow) चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या भगवान कोकरे महाराजांच्या उपोषणाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे गोशाळेतील ११०० गायी कळंबस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालयासमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी गायींना लोटे येथील महामार्गालगतच रोखले.
अनुदान मिळण्याबाबत शासनाला पत्रव्यवहार केल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी सांगितल्यानंतर महाराजांनी पुढील कार्यवाहीसाठी २ मार्चपर्यंत मुदत दिली; मात्र गोशाळेतील उपोषण सुरूच ठेवले. राज्यभरात कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चारा टंचाई आहे. किरकोळ गोशाळा वगळता सर्वांची विदारक स्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी सोडून दिलेल्या गायींचे पालनपोषण होण्यासाठी शासनाने किमान चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून भगवान कोकरे महाराज (Kokare Maharaj) यांनी लोटे येथील गोशाळेत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी सकाळी भगवान कोकरे महाराजांनी गोशाळेतील गायी कळबंस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. गोशाळेतून महामार्गापर्यंत गायींचा कळप आला; मात्र खेड पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गाजवळच (Mumbai-Goa Highway) गायींचा कळप रोखला. महामार्गावर गायी आल्या असत्या तर वाहतूक ठप्प होण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी तसेच पशुसंवर्धन सहाय्यक उपायुक्त जगदाळे यांनी कोकरे महाराजांची समजूत काढली. पशुसंवर्धन विभागाने गोशाळेत येणे असलेल्या अनुदानाची मागणी केल्याचे पत्र महाराजांना दिले. थकित अनुदान मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यानुसार रस्त्यावर आलेल्या गायी पुन्हा गोशाळेत नेण्यात आल्या.
गोशाळेतील गायींना शासनाने चारा उपलब्ध करून देण्यासाठी सहाव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले. शासनाने याची दखल घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. २ मार्चपर्यंत गोशाळेत जैसे थे उपोषण सुरू राहील. त्यावरही निर्णय न झाल्यास लोटे येथून महामार्गावरूनच गायींचा ताफा पशुसंवर्धन कार्यालयावर नेण्यात येईल. पोलादपूर येथून आलेल्या बंडाराम घाडगे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. शासनाने गोशाळेतील चाऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी कोकरे महाराज यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.