कोकण

भोसले डी. फार्मसीमध्ये रंगली राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा

CD

70333
सावंतवाडी ः भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी येथे प्रश्नमंजूषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना सुनेत्रा फाटक व अन्य.


भोसले डी. फार्मसीमध्ये रंगली
राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडली. संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले, विभागप्रमुख प्रा. ओंकार पेंडसे आदी उपस्थित होते. स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील एकूण अठरा गटांनी सहभाग घेतला. यापैकी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या अनिकेत चोपडे व विनय खरात यांनी प्रथम, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागावच्या स्नेहल बामणे व पूजा सुतार यांनी द्वितीय तर यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्या दीप्ती पिंगुळकर व पूनम वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. संदेश सुळ, प्रा. सिल्वी गोन्साल्वीस, प्रा. गायत्री आठलेकर व प्रा. गौरी भिवशेठ यांनी काम पाहिले. सुप्रिया राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. नेहा मडगावकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT