कोकण

कशेडी बोगद्यांच्या चौपदरीकरणाचे काम अधांतरीच0

CD

३ (टुडे पान १ साठी, ग्राऊंड रिपोर्ट)

(७ मार्च टुडे १)

rat१२p२६.jpg, rat१२p२७.jpg
P२४M७०७२८, P२४M७०७२९
खेड ः कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेचे सुरू असलेले काम.
rat१२p२८.jpg ः
२४M७०७३०
कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेमधील ड्रेनेजचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
rat१२p२९.jpg ः
P२४M७०७२३
सुरू असलेल्या मार्गिकेमधील लाईट फिटिंगसह अन्य कामे करतात कामगार.
rat१२p३०.jpg ः
२४M७०७२४
कशेडी बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत.
rat१२p३१.jpg ः
२४M७०७२५
कशेडी बोगद्याकडे जाणारे रस्ते अपूर्ण आहेत.
-------

कशेडी बोगद्यांचे चौपदरीकरण अधांतरीच

शिमगोत्सवातही चाकरमान्यांचा प्रवास जिकिरीचाच : मार्चअखेरचा मुहूर्त हुकणार

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. १२ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणातील महत्वाचा टप्पा असलेल्या कशेडी बोगद्याचे चौपदीकरण मात्र अद्यापही अंधातरीच आहे. या बोगद्यातून सध्या एकेरी वाहतूक सुरू असली तरी एक बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने जाहीर केलेली मार्चअखेरची मुदत उलटून जाणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग यावर ठाम आहे. अभियंता पंकज गोसावी यांनी चारपदरी कशेडी बोगदा १४ एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे शिमगोत्सवाचा मुहूर्त बांधकाम विभागाला साधता येत नसल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी आहे. बोगद्याच्या जोडरस्त्याची अनेक कामेही अद्याप प्रलंबित आहेत.

- सिद्धेश परशेट्ये, रत्नागिरी
---

कशेडी बोगद्यातून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे; परंतु अद्याप या मार्गावरील अनेक कामे निर्माणाधीन असल्याने या मार्गावरून प्रवास करत असताना वाहनचालकांना अनेक निर्बंध पाळावे लागत आहेत. काहीवेळेस पोलादपूर बाजूने बोगद्यात प्रवेश करण्यासाठी येऊ लागलेल्या वाहनांना अचानक थांबवून पुन्हा घाटमार्गेच वळवण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन ते तीनवेळा बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. या प्रकारामुळे महामार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक संतप्त झाले होते. कशेडी बोगदा मार्चअखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करू, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने सातत्याने व्यक्त केला आहे; परंतु कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेतून सुरू असलेली एक दिशा वाहतूकदेखील निर्वेधपणे सुरू ठेवण्यात राष्ट्रीय बांधकाम विभागाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे बांधकाम विभाग व राज्यसरकार करत असलेल्या घोषणा केवळ या शिमग्यात फसव्या ठरणार आहेत.

* शिमगोत्सवात सरकार विरोधात होणार ओरड

एका बाजूला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम खूप विलंबाने व संथगतीने सुरू आहे. याबाबत उच्च न्यायालयानेदेखील कठोर शब्दांत सरकारला फटकारले. त्यातच कशेडी बोगद्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची डेडलाईन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग निश्चितपणाने सांगू शकत नसल्याने कोकणवासियांना या शिमगोत्सवातदेखील सरकारच्या विरोधात बोंबाच माराव्या लागणार आहेत. सद्यःस्थितीत जो बोगदा सुरू आहे त्या बोगद्यातील वायूव्हिजनसह विद्युतपुरवठ्याची कामे अद्यापही सुरूच असून, ही कामे होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. दुसऱ्या बोगद्यातील रस्त्यासह सर्वच कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे दुसरी मार्गिका नक्की कधी सुरू होईल, याची निश्चित तारीख नाही.
-------
चौकट :
चार महिन्याचा कालावधी लागेल
गेली अनेक वर्षे कशेडी बोगदा आणि जोडरस्त्यांचे काम सुरू आहे. प्रत्येकवेळी राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या डेडलाइन देऊन लवकरच ही मार्गिका सुरू करू, अशी बतावणी करत आहेत; परंतु कशेडी बोगदा आणि जोडरस्ते हे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही चार महिन्याचा कालावधी लोटेल, अशी शक्यता पोलादपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश पालकर यांनी वर्तवली दिली.
----
कोट

कशेडी बोगद्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान फक्त एका बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच ही वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली. कशेडी घाटातील रस्तादेखील अनेक ठिकाणी खराब झालेला आहे. त्यामुळे बोगद्यातील काम लवकरच पूर्ण करून हा मार्ग खुला झाल्यास बरे होईल,

संदीप शिरावले (चालक)
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT