२२ (टुडे ३ साठी)
-rat२९p९.jpg-
२४M७४०१९
रत्नागिरी : आदि शंकराचार्य चर्चासत्राचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय. सोबत डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. मकरंद साखळकर आदी.
------------
जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन
कृष्णकुमार पाण्डेय; संस्कृत अध्ययन उपकेंद्रात चर्चासत्राचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी आपल्या जीवनकार्यातून भारताच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील एकात्मता दृढ केली याशिवाय आपल्या परिक्रमेतून भारतातील कानाकोपऱ्यात चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच सर्वार्थाने जगद्गुरू शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले.
विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वां. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गोगटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. भारतीय भाषा समितीच्या साहाय्याने हे चर्चासत्र प्रथमच झाले.
प्रो. पाण्डेय यांनी आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेली चार पीठे, त्यांना देण्यात आलेले वेद व त्यांची केलेली सूत्रबद्ध योजना ही आदि शंकराचार्यांची दूरदृष्टी स्पष्ट करते. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठांचा उल्लेख केला शिवाय रत्नागिरीतील लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगवान परशुराम आणि आचार्य बाळकृष्ण दीक्षित या महान विभुतींचा आदरपूर्वक उल्लेख केला.
संचालक डॉ. मराठे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. साखळकर यांनी आदि शंकराचार्यांचे विचार अनुकरणीय आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या चारही पिठांचे शंकराचार्य हे सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. ऐहिक सुख-दुःखाच्या पलिकडे जाऊन केलेला विचार सार्वभौम आहे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.