कोकण

श्रुती उरणकर यांना ''राजमाता जिजाऊ गौरव''

CD

swt419.jpg
75340
बदलापूरः राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना श्रुती उरणकर.

श्रुती उरणकर यांना
‘राजमाता जिजाऊ गौरव’
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ४ः जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार मूळ कणकवली व आता डोंबिवली स्थित समाजसेविका श्रुती उरणकर यांना बदलापूर येथे प्रदान करण्यात आला. माहेरवाशीण संस्थेच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन उरणकर यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अमितकुमार गोविलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उरणकर या महाराष्ट्र राज्य महिला उत्कर्ष समिती, नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवली, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा-डोंबिवली पूर्व मंडळ, तेजस एंटरप्रायझेस, आधार इंडिया संस्था, ग्लोबल मालवणी कोकण-मुंबई, गणेश मंदिर संस्थान डोंबिवली, क्षणभर विश्रांती सस्था डोंबिवली अशा विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास वीरांगना ट्रस्टच्या फाउंडर प्रेसिडेन्ट उमा सिंह, इंटरनॅशनल स्विमर, रनर, सायक्लिस्ट नीता बोरसे, माहेरवाशिण संस्थेच्या संस्थापिका प्रभा शिर्के, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरती बनसोडे, अन्टीपायरसी सेलचे मुख्य अधिकारी रामजित गुप्ता आदी उपस्थित होते. या पुरस्काराबाबत उरणकर यांचे सिंधुदुर्ग, डोंबिवली बदलापूर, कणकवली आदी भागासहित सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. कणकवली येथील उद्योजक राजेश मानकर यांच्या त्या भगिनी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT