कोकण

तारकर्लीतील बालगोपाळांकडून आजारग्रस्तांच्या कुटुंबांना मदत

CD

swt421.jpg
75359
तारकर्लीः येथील बालगोपाळांनी शिमगा खेळातून जमा झालेला निधी गरजू रुग्णांना दिला.

तारकर्लीतील बालगोपाळांकडून
आजारग्रस्तांच्या कुटुंबांना मदत
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : शिमग्यातून जमलेल्या निधीतून तारकर्ली गावातील बालगोपाळांनी सलग सहाव्या वर्षी गरजू कुटुंबाला आर्थिक मदत करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तारकर्ली गावातील रोहन कांदळगावकर, यज्ञेश केरकर, ईशान सागवेकर, निनाद मोंडकर, रिषभ खराडे, हार्दिक टिकम, नैतिक कांदळगावकर,‌ रोहित वरक, वरुण तांडेल या बाळगोपाळांनी शिमगा खेळातून जमा झालेला निधी अविनाश चंद्रकांत धुरत आणि बबन लोणे या आजारग्रस्तांच्या कुटुंबाला मदत म्हणून दिला. त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत केली होती.
या कामाची शाबासकी म्हणून त्यांना नवी मुंबई येथील साईवेद स्पोर्ट्सचे संचालक संजय तारी यांनी मोफत जर्सी उपलब्ध करून दिली होती. तर सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या प्रदीप तोंडवळकर यांनी ५००० रुपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षीस पाठविले होते. हे बाळगोपाळ गेली सहा वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT