कोकण

आम्ही खोक्यांचे भुकेलेले नाही

CD

swt422.jpg
75361
सर्जेकोटः येथे खळा बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मतदारांशी संवाद साधला.

आम्ही खोक्यांचे भुकेलेले नाही
विनायक राऊतः समृध्द कोकणचा नारा घेऊन काम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ः आम्ही खोक्यांचे भुकेलेले नाही. सत्ता, संपत्ती, पैसा, सोने, चांदी याचेही आम्ही भुकेलेले नाही किंवा कोकणच्या विकासाच्या नावाखाली कोकणाला आम्ही लुबाडले नाही. ओरबडले नाही, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी सर्जेकोट येथे केली.
श्री. राऊत यांनी प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील सुकळवाड, तिरवडे, पेंडुर, चाफेखोल, नांदरुख, तारकर्ली, सर्जेकोट, तोंडवळी या गावांना भेटी देत खळा बैठका घेतल्या. या खळा बैठकांना ठाकरे शिवसैनिकांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी हरी खोबरेकर, मंदार शिरसाट, जान्हवी सावंत, नितीन वाळके, मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर, विजय नेमळेकर, सिया धुरी, अमोल वस्त, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे, श्वेता सावंत, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, जेम्स फर्नांडिस, अरविंद मोंडकर, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, "निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर परप्रांतीयांचा डोळा आहे. या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याच्या दृष्टीने या जमिनी सिडकोच्या ताब्यात देण्याचा डाव राज्याने आखला आहे. परप्रांतीयांनी किनारपट्टीवर घेतलेल्या ज्या जमिनी आहेत व ज्या जमिनी घेऊ इच्छितात त्या सर्व जमिनींना ग्रामसभेत इथल्या जनतेचा विरोध होईल हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीला दुय्यम स्थान देऊन या जमिनी सिडकोच्या नियंत्रणाखाली आणण्याचा डाव सरकार आखत आहे. हा डाव हाणून पाडण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. सिडकोला जमिनी देण्याचा घेतलेला निर्णय हा रद्द केला गेला नाही तर महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याला त्याच्या केबिनमध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा आम्ही दिला आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे कोकणातील साडे सहा लाख हेक्टर जमीन तर सिंधुदुर्गातील एक लाख हेक्टर जमीन दिल्ली आणि हरियाणा येथील परप्रांतीयांच्या घशात जाणार आहेत. याबाबत भाजपने तोंड उघडले नाही. सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांनी देखील तोंड उघडलेले नाही. मात्र, या विरोधात आम्ही आवाज उठवीला आहे. सी वर्ल्डला आमचा विरोध होता. पावणे तीनशे एकर जमिनीत होणारा सी वर्ल्ड प्रकल्पाच्यानावाखाली तोंडवळी, वायंगणी येथील तेराशे पाच एकर जमीन हडप करण्याचा डाव होता."
ते पुढे म्हणाले, "आताच्या सरकारने रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जबरदस्तीने प्रिपेड मीटर बसविण्याचा घाट घातला होता तो आम्ही हाणून पाडला. ज्या जमिनी वन संज्ञा म्हणून लावल्या आहेत, त्या रद्द करा ही आमची मागणी आहे." यावेळी आमदार वैभव नाईक, जान्हवी सावंत, हरी खोबरेकर, नितीन वाळके यांची भाषणे झाली.

चौकट
५०९ कोटींची भूमिगत वीज वाहिनी मंजूर
श्री. राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दिले. पुढच्यावर्षी शंभर डॉक्टरांची फौज या मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडेल. ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येते, त्या-त्या वेळी इथला वीज पुरवठा खंडित होतो म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचशे नऊ कोटी रुपयाची भूमिगत वीज लाईन मंजूर केली. काही ठिकाणी त्याची कामेही सुरु झाली आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT