कोकण

काजू हमीभाव अंमलबजावणीस आचारसंहितेमुळे आले अडथळे

CD

काजू हमीभाव अंमलबजावणीस
आचारसंहितेमुळे आले अडथळे

केसरकर ः सावंतवाडीत बागायतदारांमवेत बैठक


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः काजू बी ला १३५ रुपये प्रति किलो हमीभाव आणि काजूला दहा रुपये प्रति किलो अनुदान देण्याबाबतचा निर्णय आचारसंहीतेपुर्वीच सरकारने घेतला आहे. मात्र, आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी करण्यास काही अडथळे निर्माण झाले असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी-दोडामार्ग फळबागातदार संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
श्री. केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रीधर अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात आज सावंतवाडी-दोडामार्ग फळबागातदार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीला बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, संजय देसाई, गोपाळ करमळकर, पांडुरंग देसाई, राकेश धर्णे, मोहन दळवी, शैलेश दळवी, चंद्रशेखर देसाई, सहदेव गवस, सुरेश गावडे, माजी उपसभापती बाळा उर्फ लक्ष्मण नाईक व मान्यवर तसेच ३० ते ४० काजू बागायतदार उपस्थित होते. यावेळी विविध समस्यांवर चर्चा झाली. तसेच पुन्हा मंगळवारी (ता.९) काजू कारखानदार यांच्यासह बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, असे श्री. केसरकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले. बागायतदार शेतकऱ्यांनी त्याला संमती दिली. यावेळी अध्यक्ष सावंत म्हणाले, "काजू पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी बागायतदारांनी आंदोलने केली आहेत. गेल्या काही वर्षांपासून काजूचा दर कमी होत आहे. उत्पादन आणि खर्च यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे काजूला प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी बागायतदार संघाने लावून धरली आहे. सावंतवाडी-दोडामार्ग फळबागातदार संघाच्यावतीने काजूला हमीभाव मिळावा म्हणून सुरू केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेऊन चर्चा सुरू केली आहे. रविवारी (ता.७) श्री. राणे यांची बागायतदार भेट घेणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT